जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकाचा मृतदेह आढळला,कोपरगाव तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी अमोल राजेंद्र भाकरे (वय-३५) यांच्या लक्ष्मणवाडी संवत्सर शिवारात असलेल्या उसाचे पत्र्याचे शेड मध्ये एक अंदाजे (वय-४०-४५) वय असलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने संवत्सरसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान संवत्सर शिवारात वारंवार मृतदेह आढळून येत असून या प्रकरणी संवत्सर शिवारातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी सखोल चौकशी करून हा खून आहे की आत्महत्या याचा तपास करावा अशी मागणी उपसरपंच विवेक परजणे यांनी व ग्रामस्थानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना या पूर्वीच केली आहे.

या प्रकरणी संवत्सर लक्ष्मणवाडी येथील शेतकरी अमोल भोकरे यांचे शेत असून त्यात उसाची शेती आहे.ऊस वाढलेला असून त्यात त्यांनी आपल्याला व आपल्या माणसांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात संरक्षण मिळावे यासाठी एक पत्र्याचे शेड बांधले आहे.ते रविवार दि.१३ मार्च रोजी आपल्या शेतात गेले असता त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये सहज गेले असता त्या ठिकाणी त्यांना चाळीस-पंचेचाळीस वयाचे पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे.त्यांनी या बाबत तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या बाबत नोंद केली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून घटनेचे गांभीर्य जाणून घेतले आहे.हा खून आहे की आत्महत्या याबाबत कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२५/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close