जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

२०१५ चे रब्बी अनुदान द्या- मंत्र्यांना निवेदन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सन २०१५ मध्ये रब्बी हंगामात पिकांचे अंतिम आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती मात्र त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले होते.अशा बाधित शेतकऱ्यांना देण्याबाबत शासनाने तरतूद केली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना २०१५ चे रब्बी अनुदान तातडीने देण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे केली आहे.

तत्कालीन शासनाने सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेष अनुदान जाहीर केले होते. त्यावेळी शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, रहाता, नेवासा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा या तालुक्यातील शेतक-यांना १३३ कोटी १३ लाख रुपयांचे रब्बी पिकाचे अनुदान दिले. मात्र या रब्बी पिकाचे अनुदान वाटपात कोपरगाव तालुका या अनुदान वाटपातून वगळला गेला होता.


त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, “कोपरगाव तालुका पर्जन्य छायेखाली येत असल्यामुळे तालुक्यात नेहमीच कमी पाऊस पडतो. २०१५ साली देखील दुष्काळजन्य परिस्थिती होती. त्यावेळी तत्कालीन शासनाने सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेष अनुदान जाहीर केले होते. त्यावेळी शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, रहाता, नेवासा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा या तालुक्यातील शेतक-यांना १३३ कोटी १३ लाख रुपयांचे रब्बी पिकाचे अनुदान दिले. मात्र या रब्बी पिकाचे अनुदान वाटपात कोपरगाव तालुका या अनुदान वाटपातून वगळला गेला होता. सन २०१५-१६ चा रब्बी आणि खरीप दोनही हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतक-यांच्या मोठे नुकसान झाले असतांना कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांना रब्बी पिकाच्या अनुदानापासून वंचित ठेवेलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून अतिवृष्टी झाल्यामुळे मिळालेली मदत, पिक विम्याचा झालेला लाभ व करण्यात आलेली कर्जमाफी यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अशाच अपेक्षा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असून २०१५ साली झालेला अन्याय दूर करून शेतकऱ्यांना २०१५ चे रब्बीचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावेही या निवेदनात आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close