जाहिरात-9423439946
खेळजगत

आत्मा मालिकचा विवेक नायकल मल्ल रौप्यपदकाचा मानकरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक कुस्ती केंन्द्राचा पैलवान विवेक भरत नायकल याने ओरीसा राज्यातील भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचला आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ओरीसा राज्यातील भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या आहेत.या स्पर्धांसाठी देशाच्या सर्व विद्यापिठातून प्रथम आलेल्या आठ मल्लांची निवड या स्पर्धेत करण्यात आली होती. विवेक भरत नायकल हा संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती या विद्यापिठाकडून ८६ किलो वजन गटात कुस्ती खेळला आहे.त्याने त्यासाठी हरियाणा, मध्येप्रदेशच्या मल्लांना या स्पर्धेत लोळवले आहे.

ओरीसा राज्यातील भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या आहेत.या स्पर्धांसाठी देशाच्या सर्व विद्यापिठातून प्रथम आलेल्या आठ मल्लांची निवड या स्पर्धेत करण्यात आली होती. विवेक भरत नायकल हा संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती या विद्यापिठाकडून ८६ किलो वजन गटात कुस्ती खेळला आहे.त्याने त्यासाठी हरियाणा, मध्येप्रदेशच्या मल्लांना या स्पर्धेत लोळवले आहे.व अंतिम फेरी गाठली आहे. संपन्न झालेल्या अंतिम चुरशीच्या लढतीत विवेक नायकल रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे. राज्याला रौप्य पदक मिळवून देणारा नायकल आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा शुध्द शाकाहारी मल्ल असल्याची माहिती मिळाली आहे. नायकल याने रौप्यपदक मिळवून आत्मा मालीक संकुलात येताच त्याची वाजत गाजत जंगी मिरवणुक काढण्यात आली. विवेक नायकल याने आश्रमाचे आत्मा मालीक गुरूदेव माउलींचे दर्शन घेवून, मिळालेले रौप्यपदक माऊलींच्या चरणी समर्पीत करताच गुरूदेव माऊलींनी नायकलच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळवली आहे.

यावेळी विवेकानंद महाराज,आत्मानंद महाराज, गणेश महाराज यांनी अभिनंदन केले आहे. तर विश्वात्मक जंगली महाराज आश्रय ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,विश्वस्त वसंत आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्राचार्य सुधाकर मलिक,अर्जूनराव डांगे,वसंतराव गायकवाड, अशोक कांगणे,रमेश कालेकर कुस्ती केंद्राचे प्रमुख भरत नायकल, प्रशिक्षक सोनू काबिले, राजू पाटील यांनी रौप्य पदक पटकवल्या बद्दल विवेक नायकल याचा सत्कार करण्यात आला आहे. भविष्यात राष्ट्रकुल स्पर्धेत उतरण्या बरोबर भविष्यात ऑलिंपिकचे पदके मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नायकल याने सांगितले. दरम्यान आत्मा मालिक कुस्ती केंद्रात शाकाहारी मल्ल निर्माण करण्याची परंपरा आहे. येथे माती व चटई यासह अत्याधुनिक सुविधा असणारे कुस्ती केंद्र निर्माण केले असून आत्मा मालिकच्या लौकिकात भर टाकली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close