कोपरगाव तालुका
दलितवस्ती पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करणार-सरपंच सौ.पवार

संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-( संजय भारती )
नगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परीषद समाज कल्याण विभागाकडुन ग्रामिण भागातील अनुसुचित जाती-जमाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील परीसर रस्ते शुशोभिकरण, बंदिस्त गटार, समाज मंदीर दुरूस्ती, सार्वजनिक शौचालये, पाणी पुरवठा योजना, अशा विविध विकास कामासाठी मिळणाऱ्या निधीतुन ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे सुरु असल्याची माहिती हिंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच जिजाबाई पवार यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
हिंगणी गावातील महिलाच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याला आगामी काळात आपण प्राधान्य देणार आहे व बालकल्याण योजना राबविणे हे आपले पुढील उदिष्ट असल्याची माहिती सरपंच जिजाबाई पवार शेवटी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हिंगणी यांनी ‘दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदाई चे काम हाती घेतले आहे. दि ..५ फेब्रुवारी रोजी सुरु झालेले हे काम आता प्रगतीपथावर असुन वेळेत पूर्ण करणार असल्याची माहीती सरपंच पवार यांनी दिली आहे. हिंगणी येथील प्रसिद्ध राघोबादादा पेशवे यांनी बांधलेल्या ‘तिन भिंतीच्या वाडयाला” सदिच्छा भेट देणाऱ्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या कि उन्हाळ्यात येथील वसंत बंधाऱ्यातील पाणी साठा संपल्या नंतर ग्रामस्थांना मोठया पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असुन दररोज दहा कि .मी. अंतरावर असणाऱ्या हातपंपावरुन पायपिट करत पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.या योजनेमुळे पिण्याचे व महिलांना घरगुती वापरासाठी लागणारे पाणी हे आता सहज उपलब्ध होणार आहे. एकंदरीत,दलित वस्ती सह संपूर्ण गावाचाच पाणीप्रश्न आता कायमच मार्गी लागणार आहे. अंदाजे १२ लाख रुपये खर्चाच्या या योजनेत विहीर खोदाईसह संरक्षण भिंती बांधणे, निविन जलवाहिनी टाकणे, व स्वतंत्र नळ जोडणी या कामांचा समावेश आहे.या कामी होत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व हिंगणी ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले आहे.