कोपरगाव तालुका
या पालखी मार्गास गुरु शुक्राचार्यांचे नाव द्या-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर असलेल्या पूर्व-पश्चिम मार्ग असलेल्या शुक्राचार्य मंदिरापर्यंत असलेल्या मार्गाला दैत्य गुरु शुक्राचार्यांचे नाव द्यावे अशी महत्वपूर्ण मागणी सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव बेट देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
कोपरगाव बेट भागात दैत्य गुरु शुक्राचार्य यांची समाधी मंदिर आहे.या ठिकणी त्यांनी संजीवनी मंत्र कचदेव याना दिला होता असा सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन वारसा या शहराला लाभला असून या ठिकाणी.पूर्वीपासून भाविक भक्तांचा राबता असतो.मात्र अलीकडील काळात या गौरवशाली इतिहासाला तरुण पिढी विसरली आहे.त्यांना पुन्हा या वारशाची आठवण करून देण्यासाठी गोदावरीच्या दक्षिण बाजूच्या छोट्या पुलापासून शुक्राचार्य मंदिरापर्यंत असलेल्या रस्त्याला पालखी मार्ग हे नाव देण्याची आवश्यकता आहे.या मार्गावरून वर्षात अनेक वेळा गुरु शुक्राचार्यांची पालखी नेली जाते.त्यामुळे या मार्गाला “शुक्राचार्य पालखी मार्ग “असे नाव देणे गरजेचे आहे.अशी मागणीही बाळासाहेब आव्हाड यांनी शेवटी केली आहे.