जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

भाजपाला,मोदी मंचला माजी खा.वहाडणे यांच्या जयंतीचा विसर !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भाजप केंद्रात व कोपरगाव नगरपरिषदेत सत्तेत असताना या सर्वांना माजी भारतीय जनता पक्षाचे संस्थापक व माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व.सूर्यभान पा. वहाडणे यांची आज जयंती असताना त्या बाबत कुठेही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने या बाबत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपणच आपल्या पित्याची जयंती कशी साजरी करणार ? असा प्रतिप्रश्न विचारला असून आपण असे करणार नसल्याचे बजावले आहे ज्यांना करायची असेल ते करतील अन्यथा ना करतील, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे म्हटले असून स्वतःचे अंग झटकून टाकले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगावचे सुपुत्र व भाजपचे राज्यात संस्थापक असलेल्या नेत्यांपैकी एक असलेले माजी खा.सुर्यभान पाटील वहाडणे हे राज्यात १९९५ ते १९९९ या दरम्यान शिवसेना व भाजपाची युती सत्तेत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.त्या नंतर त्यांनी दिल्लीत राज्यसभेत जाऊन आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले होते.त्यांच्या कालखंडात त्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष व विद्यमान भाजपचे आ. हरिभाऊ बागडे,यासह खान्देश, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात भाजपाला सत्तास्थानी नेऊन बसविण्यात अहंम भूमिका वटवली होती.ते २००८ पर्यंत हयात असताना कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यात त्यांनी साखर कारखानंदारांना आपल्या कह्यात ठेवण्यात मोलाची भूमिका वटवली होती.

दरम्यान भाजपचे कोल्हे गटाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,आपण तालुका पातळीवर कुठलाही कार्यक्रम घेतला नाही.त्यांचा मुलगा करतो असल्याचे म्हणून स्वतःची सुटका करून घेतली आहे.तर कोपरगाव शहराचे अध्यक्ष कैलास खैरे यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही.

जनसंघ व भाजप जनमानसात पोहचविण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती.आज भाजपच्या तिकिटासाठी अनेक साखर सम्राट व मद्यसम्राट देव पाण्यात घालून बसलेले दिसतात मात्र त्यांची निवडून येण्याची गरज संपली कि ते वहाडणे या विचाराकडे पाठ फिरवतात हे गत दोन विधानसभा निवडणुकीसह अनेक वेळा सिद्ध झाले आहे.

या बाबत मोदी विचार मंचचे तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी,मोदी मंच आता अस्तित्वात नसल्याचे सांगून आपल्या गावात एक धार्मिक कार्यक्रम असल्याने आपण ह.भ.प.इंदोरीकर महाराजांची तारीख घेण्यासाठी त्यांच्या गावी आलो असल्याची सबब सांगितली आहे.तशीच सबब भाजपचे शहर सरचिटणीस चेतन खुबाणी यांनी आपण दोन दिवस बाहेर असल्याने त्याच्या घरी जाऊन आदरांजली अर्पण केली असून सार्वजनिक ठिकाणी जयंती केली नसल्याची कबुली दिली आहे.

स्व.सूर्यभान वहाडणे यांचा त्या काळात प्रदेशाध्यक्ष असताना इतका दरारा होता कि प्रदेश कार्यालयात प्रवेश करताना तत्कालीन नेते व उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे व सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनाही चारवेळा विचार करून त्यांच्या दालनात प्रवेश करावा लागत असे.प्रवेश करण्याआधीच ते कार्यालयीन शिपायास पाटलांचा मुड कसा आहे ? अशी विचारणा करूनच कार्यालयात प्रवेश करीत असत त्यांचा मुड व्यवस्थित नसल्याचा सुगावा लागला कि ते तेथूनच आल्या पावली परत जात असत. इतका या नेत्याचा राज्यात आदरयुक्त दरारा होता.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने या बाबत नरेंद्र मोदी विचार मंचचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपण कोर्टाच्या कामात असल्याने वेळ मिळाला नसल्याचे म्हटले असून आपण व्हॉट्सअपवर श्रद्धांजली अर्पण केल्याचे सांगीतले आहे.

त्यांच्या या कार्यानेच आज त्याचे सुपुत्र विजय वहाडणे हे कोपरगाव नगरपरिषदेचे नोव्हेंबर २०१६ रोजी काळे कोल्हे या शक्तीला पर्याय म्हणून निवडून आलेले लोकनियुक्त अध्यक्ष आहे.आजही मुंबई दिल्लीत स्व.वहाडणे पाटील यांच्या नावावर आजही काम करणारे बडे नेते आहेत.मात्र आज त्यांचा जन्मभूमीतच त्यांची प्रतारणा झाल्याचे दिसत आहे.कार्यकर्ते आणि नेते आपल्या सोयी प्रमाणे आजही उगवत्या सुर्यालाच नमस्कार करतात असे दिसून आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close