जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…जिओचा मनोरा अखेर हलवला-आंदोलनाला यश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात वादग्रस्त ठरलेला व कुठलीही अधिकृत परवानगी नसलेला जिओ या दूरक्षेत्रातील कंपनीचा वादग्रस्त मनोरा अखेर मनसेच्या आंदोलनामुळे काढून घेण्याची नामुष्की या कंपनीवर आली असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव नगरपालिका हद्दीत जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी येवला रस्त्यावर नगरपरिषदेला डावलून आपला मनोरा उभारला होता.त्यावरून पालिकेने त्यांना अनेक नोटिसा बजावल्या होत्या तरीही त्यांनी आपलेच घोडे दामटले होते.व आपले काम थांबवले नव्हते.त्यामुळे शहरातील नागरिकांत नाराजी होती या बाबत कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रकरणी सर्वप्रथम आवाज उठवला होता

कोपरगाव नगरपालिका हद्दीत जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी येवला रस्त्यावर नगरपरिषदेला डावलून आपला मनोरा उभारला होता.त्यावरून पालिकेने त्यांना अनेक नोटिसा बजावल्या होत्या तरीही त्यांनी आपलेच घोडे दामटले होते.व आपले काम थांबवले नव्हते.त्यामुळे शहरातील नागरिकांत नाराजी होती या बाबत कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रकरणी सर्वप्रथम आवाज उठवला होता व त्या मनोऱ्याला हटविण्याआठी अनेक निवेदन देऊनही या कंपनीचे प्रशासन दाद द्यायला तयार नव्हते.अखेर मनसेने या बाबत या कंपनीच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करून या कंपनी विरुद्ध २५ जानेवारी आमरण उपोषण केले होते.तर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.नगरपरिषद प्रशासनाने या बाबत आंदोलन मागे घेण्यासाठी पत्रव्यवहार केला होता मात्र कार्यकर्ते हे आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नव्हते.अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या दलनापुढे ठिय्या आंदोलनाचा नुकताच इशारा दिला होता.अखेर हे आंदोलन सुरु करण्यात आले होते.

त्याची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली व त्यांनी संबंधित कंपनीवर दबाव वाढवून अखेर हा अर्धवट मनोरा काढून घेतला आहे.या आंदोलनाला मागे घेण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांची शिष्टाई फळाला आली असून त्यांनी या आंदोलनकर्त्यांना लेखी दिल्यावर व हा कंपनीचा मनोरा हटविल्याची खात्री झाल्यावर आपले आंदोलन मागे घेतले आहे. सदर प्रसंगी शहर अध्यक्ष सतीश काकडे,तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,माजी तालुकाध्यक्ष अलीम शहा,रघुनाथ मोहिते,योगेश गंगवाल,सचिन खैरे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close