कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन महिन्यात ४१ कोटी ५८ लाख
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची व अडचणींची जाणीव असणारे शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यापासून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी व पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून तब्बल ४१ कोटी ५८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील ३७ हजार ५५४ शेतकऱ्यांना शासनाकडून पहिल्या टप्प्यात ८ कोटी २८ लाख व दुसऱ्या टप्प्यात १९ कोटी ६७ लाख रुपये असे एकूण २७ कोटी ९५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभागी झाले होते. या योजनेत सहभागी झालेल्या जवळपास १५ हजार ४९५ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून १३ कोटी ६३ लाख ६४ हजार रुपये मिळाले मिळाले आहेत.
मागील वर्षी २०१९-२० च्या खरीप हंगामात संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे देखील सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. निवडणुकीच्या निकालानंतर आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागाला झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
कोपरगाव तालुक्यातील ३७ हजार ५५४ शेतकऱ्यांना शासनाकडून पहिल्या टप्प्यात ८ कोटी २८ लाख व दुसऱ्या टप्प्यात १९ कोटी ६७ लाख रुपये असे एकूण २७ कोटी ९५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभागी झाले होते. या योजनेत सहभागी झालेल्या जवळपास १५ हजार ४९५ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून १३ कोटी ६३ लाख ६४ हजार रुपये मिळाले मिळाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीन महिन्यातच तालुक्यातील शेतकऱ्यांना ४१ कोटी ५८ लाख रुपयांचा लाभ झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना एवढ्या कमी कालावधीत कमीत कमी कागदपत्रांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळण्याची हि पहिलीच वेळ आहे. तयच बरोबर महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना बोटाच्या अंगठ्यावर कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला असून या कर्जमाफीचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे. या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.