कोपरगाव तालुका
आर्थिक विकास योजना बँकांनी गरजूंपर्यंत न्यावी-ना.पाटील
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव (प्रतिनिधी):
बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतील माहिती समजुन घेत गरजुंपर्यंत सुलभतेने नेण्यासाठी जबाबदारीने काम पहावे.असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसंदर्भात कोपरगांव तालुक्यातील सर्व बँकांची आढावा बैठक तहसिल कार्यालय कोपरगांव येथे आज सकाळी आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नामदार नरेंद्र पाटील होते.
सदर प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन चौगुले,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे,कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे,भाजप तालुका अध्यक्ष शरद थोरात,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,अनिल चव्हाण,अंबादास वडांगळे,माजी सभापती सुनील देवकर,सुनील शिलेदार,मधुकर साबळे,फकीर कुरेशी,चंद्रशेखर म्हस्के,युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर, सह मराठा समाजाच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, या योजने संदर्भात सर्व माहिती बँक अधिकारी आणि प्रतिनिधींना दिली. तसेच तरुण उद्योजकांच्या समस्या जाणून त्या संदर्भात बँक अधिकारी यांना सुचना केल्या.
या बैठकीत उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले.सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी तर आभार पं.स.उपसभापती अर्जुन काळे यांनी मानले.
मराठा उद्योजक लाँबी कँलेंडरचे अनावरण करण्यात आले.तसेच या योजनेचे लाभार्थी दत्तात्रय जाधव,संतोष कुटे या लाभार्थ्यांना मालवाहतूक वाहनाचे वितरण करण्यात आले.