जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध पाणीपुरवठा योजनांचे मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठा तातडीने कार्यान्वित कराव्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी नूकतीच केली आहे.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करून पाणी पुरवठा योजनांना येत असलेल्या अडचणी मांडल्या. त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ३६ गावांतील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांवर १० एच.पी.पर्यंतची मोटर चालविण्यासाठी सोलर पॅनल बसवण्यास ना. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला- आ.काळे

या पडलेल्या बैठकीत त्यांनी कोपरगाव मतदार संघातील अनेक गावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भातील विविध प्रश्न मांडून नागरिकांना होत असलेल्या अडचणींकडे मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. या बैठकीत बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव मतदारसंघातील रोहित्र नसल्यामुळे बंद असलेल्या ३६ गावच्या स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत सौरऊर्जेवर स्वयंचलित करण्यात याव्या. सन २०१८-१९ व २०१९-२० या वर्षातील तत्वतः मंजूर तसेच विविध कारणांमुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात याव्या.अनेक वर्षांपासून रखडलेली धारणगाव व इतर ४ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यावी.वीज पुरवठा खंडित असल्यामुळे बंद असलेली रांजणगाव व इतर ६ गावे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर स्वयंचलित करण्यात येवून सदर योजनेच्या तलावाला गळती असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी. पाण्याच्या चाचणीच्या कारणामुळे बंद असलेली मायगाव देवी पाणीपुरवठा योजना सुरू करावी. सदर मागण्यांचा मंत्रीमहोदयांनी गांभीर्याने विचार करून बैठकीत ३६ गावांतील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांवर १० एच.पी. पर्यंतची मोटर चालविण्यासाठी सौरऊर्जा संच बसवण्यास सकारात्मक प्रतिसाद देत वारी, कान्हेगावसह इतर गावच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रती माणसी ५० ली. प्रमाणे सुधारित अंदाजपत्रक तयार करावे, धारणगाव व इतर ४ गावे तसेच रांजणगाव व इतर ६ गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी समक्ष पाहणी करून तातडीने अहवाल तयार करावे. त्याचबरोबर मायगाव देवी पाणीपुरवठा योजनेची चाचणी घेऊन कार्यान्वित करण्याच्या सूचना ना.पाटील यांनी या बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close