जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव जनता दरबारात तक्रारींचा पाढा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी जनता दरबारात यापैकी किती नागरिकांचे प्रश्न व अडचणी सुटल्या याचा खुलासा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे व त्याचा जाब जनता दरबारातच द्यावा लागणार असल्याचा दावा करून आगामी जनता दरबारातील प्रश्न पुढच्या जनता दरबारात येता कामा नये असा इशारा श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिला आहे.

“समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला वीस कोटींचा मोठा दंड होऊनही तो का भरला जात नाही ? तर वाळूसारख्या गौण खनिजाबाबत कायदा नियम का पाळले जात नाही ? कोपरगाव नगर परिषद हद्दीत मोठा निधी येऊनही रस्त्यांची कामे सुमार दर्जाची होत असताना त्या वर नियंत्रण का ठेवले जात नाही ? लोकप्रतिनिधींनी कितीही निधी आणला तर पुढे पाठ मागे सपाट होण्याचा धोका आहे.तालुक्यातील अधिकाऱ्यांनीं आता कागदी घोडे नाचविण्याचे बंद करा”-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.

गट अडीच वर्षांपासून कोरोना साथ सुरु असल्याने कोरोना कालखंडात जनता दरबार संपन्न झाला नव्हता या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या विविध पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांत ढिलाई आली होती.परिणामस्वरूप अनेक जनतेची कामे रेंगाळली होती.महसूल विभागात मोठी बेदिली माजली होती.त्यातून तालुका प्रतिनिधी व प्रशासन यांचे विरोधात जनतेत समाधान पसरले होते.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकताच जनता दरबार घेतला असून यात जनतेच्या विविध समस्यांनीं मोठया प्रमाणावर डोके वर काढले होते.त्या पार्श्वभूमीवर हा इशारा दिला आहे.

सदर प्रसंगी या जनता दरबार प्रसंगी नव्यानेच दाखल झालेले कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे,कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रशांत वाकचौरे,डावा कालवा उपअभियंता तात्यासाहेब थोरात,उजवा कालवा उपअभियंता महेश गायकवाड,प्र.तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,कोपरगाव नगरपरिषदेचे ज्ञानेश्वर चाकणे,महावितरण अभियंता भूषण आचार्य,सहाय्यक अभियंता अतुल खंदारे,यज्ञेश शेलार,डी.डी.पाटील,सहा.पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,सहा.पोलीस उपनिरीक्षक यशवंत ठोंबरे,चारी ड्रेनेज उपअभियंता शिंदे,वनविभाग श्रीम.प्रतिभा पाटील, सामाजिक वनीकरण उपअभियंता श्रीम.पूजा रक्ताटे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर आदी खात्याचे अधिकारी,पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कारभारी आगवण,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगुले,युवक अध्यक्ष नवाज कुरेशी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,जिल्हापरिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडीयाल,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके, फकीर कुरेशी,आकाश डागा,राजेंद्र जोशी,चंद्रशेखर म्हस्के,प्रदीप कुऱ्हाडे,संजय काळे,राजेंद्र खिलारी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी वीज महावितरण कम्पणीच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. व समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला वीस कोटींचा मोठा दंड होऊनही तो भरला जात नाही याचे आश्चर्य व्यक्त केले आहे.तर वाळूसारख्या गौण खनिजाबाबत कायदा नियम का पाळले जात नाही ? कोपरगाव नगर परिषद हद्दीत मोठा निधी येऊनही रस्त्यांची कामे सुमार दर्जाची होत असताना त्या वर नियंत्रण का ठेवले जात नाही ? लोकप्रतिनिधींनी कितीही निधी आणला तर पुढे पाठ मागे सपाट होण्याचा धोका मागील अनुभवावरून विशद करुन अधिकाऱ्यांना कागदी घोडे नाचविण्याचे बंद करण्याचे आवाहन केले आहे.कोपरगाव येथील तलाठी कार्यालयातील चार लाखांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. तर राजेंद्र खिलारी यांनी जलसंपदा विभागाच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहे.व तालुक्यातील अनेक नागरिकांना घरकुल मिळत नसलेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.व त्यात त्यांनी नेमके वर्मावर बोट ठेवले आहे.
यावेळी नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरूपात घेवून सबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत तातडीने निर्णय घेवून कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या नागरिकांच्या अडचणी व प्रश्न जास्तीत जास्त स्वरूपात कसे मार्गी लागतील यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग,नगरपालिका,पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग,भूमी अभिलेख,पाटबंधारे विभाग,कृषी विभाग,ग्रामीण रुग्णालय,रेल्वे विभाग,सहाय्यक निबंधक विभाग,दुय्यम निबंधक विभाग,वन विभाग,कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन,सामाजिक वनीकरण,वखार महामंडळ आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जनता दरबार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close