जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्याला २.७१ कोटी नुकसान भरपाई मंजूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गत वर्षी २०२१ मध्ये ऑगस्ट,सप्टेबर महिन्यात अतिवृष्टी होवून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता.या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव तालुक्याला २.७१ कोटी नुकसान भरपाई मंजूर केली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

दरम्यान या पूर्वी अतिवृष्टींच्या नुकसानीपोटी कोपरगाव मतदार संघातील शेतकरी व नागरिकांना या पूर्वी ३ कोटी ९ लाखाचे अनुदान वाटप केले असून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा २ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई दिल्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होवून शेती पिकांसह सार्वजनिक मालमत्तांचे देखील मोठे नुकसान झाले होते.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नव्हता.कोपरगाव तालुक्यात देखील जोरदार अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या नुकसानीचे पंचनामे करावे.नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशा सूचना त्यावेळी ना.काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिल्या होत्या.त्यानुसार सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते.या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,मदत व पुनर्वसनमंत्री ना.विजय वडेट्टीवार तसेच कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव तालुक्यासाठी २ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.हि रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती ना.काळे यांनी दिली आहे.

यापूर्वी अतिवृष्टींच्या नुकसानीपोटी मतदार संघातील शेतकरी व नागरिकांना या पूर्वी ३ कोटी ९ लाखाचे अनुदान वाटप केले असून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा २ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई दिल्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close