जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील…या नगरसेवकांवर होणार अपात्रतेची कारवाई ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत पूनम चित्रपट गृहासमोरील अतिक्रमण हटविल्या प्रकरणी आकस धरून तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना मारहाण करून कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात केलेल्या तोडफोडीतून माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला होता.त्यातून त्यांना सात वर्ष अपात्र करावे अशी मागणी सुनील फंड यांनी केलेली आहे.त्याबाबत येत्या ०३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून योगेश बागुल व कैलास जाधव यांना निवडणुकीसाठी पात्र की अपात्र ठरणार या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोर्डे यांनी शासनाच्या नियमानुसार कोपरगाव शहरातील पूनम चित्रपटगृहासमोरील अतिक्रमणे त्याचे चलचित्रण करत काढली होती.त्यात त्यांनी त्या अतिक्रमणात शिवसेना प्रमुख यांचे छायाचित्र असल्याचा कांगावा केला होता.मात्र तो तत्कालीन उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी सप्रमाण खोटा ठरवला होता.त्याचा राग धरून माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी उपकार्यकारी अधिकारी गोर्डे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोर्डे यांनी शासनाच्या नियमानुसार कोपरगाव शहरातील पूनम चित्रपटगृहासमोरील अतिक्रमणे त्याचे चलचित्रण करत काढली होती.त्यात त्यांनी त्या अतिक्रमणात शिवसेना प्रमुख यांचे छायाचित्र असल्याचा कांगावा केला होता.मात्र तो तत्कालीन उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी सप्रमाण खोटा ठरवला होता.त्याचा राग धरून माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी उपकार्यकारी अधिकारी गोर्डे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती व कोपरगाव नगरपरिषदेचे कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.त्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४ नुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र तत्कालीन उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४ वर नाराज होवून या असामाजिक तत्वांना चाप बसावा यासाठी माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर सात वर्षासाठी अपात्रतेची कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना येथील कार्यकर्ते सुनील फंड यांनी दिले होते.

दरम्यान त्या बाबत कार्यवाही सुरु झाली असून सुनील फंड याना नुकतेच जिल्हाधिकारी यांनी त्यांना कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचे मार्फत नोटीस पाठवली असून त्यात त्यांनी ०३ मार्च रोजी दुपारी ०१ वाजता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या दालनात सुनावणी होणार असल्याचे व त्यासाठी हजर रहाण्याचे फर्मान त्यांनी काढले आहे.त्यामुळे माजी नगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव यांचेवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे कोपरगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागुन आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close