जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जनता दरबार ठरला गोंधळी दरबार,संधी न मिळताच अनेक जण गेले माघारी ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव तहसील कार्यालयात आ. आशुतोष काळे यांनी जनतेच्या समस्या सोडण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारात सभेच्या नियंत्रणाभावी हा दरबार महावितरण आणि पोलीस विभागाच्या कारवाई नंतर महसुलच्या कारवाई प्रसंगी समस्याग्रस्त नागरिकांनी आ. काळे व उपस्थित अधिकाऱ्यांसमोर एकच गर्दी केल्याने “गोंधळी दरबार” ठरल्याचा दाहक अनुभव नागरिकांच्या वाट्याला आल्याने अनेकांना आपले प्रश्न न मांडताच आल्या पावली परत माघारी फिरावे लागले आहे.

महावितरणच्या गैरकारभाराचे धिंडवडे काढताना उपस्थित शेतकऱ्यांनी,” हा विभाग शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा न करता रात्री वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना मोठ्या जोखमीत ढकलत असल्याचा आरोप केला.अनेक रोहित्रावर साधे फ्यूज टाकण्याची या विभागाची दानत नाही,रोहित्रे बदलून घेण्यासाठी सरळ-सरळ पैशाची मागणी केली जाते,संवत्सर येथील शृंगेश्वर रोहित्रावर फ्यूज टाकण्यासाठी एक तरुण गेला असता त्याला आपला जीव गमवावा लागल्याचा दाखला देऊन आता शेतात पाणी भरण्यासाठी अधिकाऱ्यांनाच शेतात पाठवले पाहिजे अशी मागणी सुरेश रासकर यांनी केली.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीसह राज्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये निवडणूका संपन्न होऊन राज्यात शिवसेनेने भाजपशी काडीमोड करून आघाडीशी महाआघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे.कोपरंगावातही भाजपच्या आ. स्नेहलता कोल्हे यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी अवघ्या ८२२ मतांनी पराभव करून आपला झेंडा रोवला.त्यानंतर त्यांनी कोपरगाव शहर व तालुक्यात विकास कामांना धडाकेबाज सुरुवात केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.त्यातच तालुक्यात या पूर्वी त्यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात महावितरण व महसूल संबंधी तर तक्रारींचा महापूर आलेला दिसून आला आहे.त्यामुळे नागरिकांच्या आणखी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी त्यांनी गत सप्ताहात जनता दरबाराचे आयोजन केले होते मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तो जनता दरबार अचानक रद्द करावा लागला होता.त्यामुळे तो पुढे ढकललेला जनता दरबाराचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयोजन करण्यात आले होते.त्यातही नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्याने नागरिकांची गर्दीही लक्षवेधी होती.

आपल्याला हद्दपार करण्यासाठी वारंवार नोटिसा काढल्या जातात. आपल्या मुलांना दरोड्याचा गुन्ह्यात अडकवले जाते,सामान्य माणूस पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतात. आपल्याला विनाकारण चार दिवस जेलमध्ये टाकले असा आरोप अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी करून “मोगलाईची”आठवण करून दिली.आपण या प्रकाराला वैतागलो असून शेवटी आत्महत्या करण्याचा इशारा दिला. शहरात पोलीस अधिकाऱ्यांची दहशत असल्याचा आरोप केला.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी,युवकांचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,कोपरगाव नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद,साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर,कर्मवीर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे,नारायण मांजरे,महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.एस.खराटे,उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,कोपरगाव शहर ठाण्याचे हे.कॉ. ए. व्ही.गवसने आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व महिला तक्रारदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दरबारात प्रथम दर्शनीच महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडून आले.तक्रारदार संवत्सर येथील श्री कांबळे, खिर्डी गणेश येथील शेतकरी वसंत लोखंडे, मंजूर येथील शेतकरी अशोक मोरे, मढी येथील सरपंच वैशाली आभाळे,टाकळी येथील शेतकरी भाऊसाहेब देवकर,सांगवी भुसार येथील ठकण शिंदे,टाकळी येथील भागवतराव देवकर,वारी येथील अशोक काळे आदींनी महावितरणच्या गैरकारभाराचे धिंडवडे काढताना,” हा विभाग शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा न करता रात्री वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना मोठ्या जोखमीत ढकलत असल्याचा आरोप केला.अनेक रोहित्रावर साधे फ्यूज टाकण्याची या विभागाची दानत नाही,रोहित्रे बदलून घेण्यासाठी सरळ-सरळ पैशाची मागणी केली जाते,संवत्सर येथील शृंगेश्वर रोहित्रावर फ्यूज टाकण्यासाठी एक तरुण गेला असता त्याला आपला जीव गमवावा लागल्याचा दाखला देऊन आता शेतात पाणी भरण्यासाठी अधिकाऱ्यांनाच शेतात पाठवले पाहिजे अशी मागणी सुरेश रासकर यांनी केली. त्याला शेतकऱ्यांना टाळ्यांच्या गजरात दुजोरा देऊन या प्रश्नांची दाहकता दाखवून दिली आहे.अनेक रोहित्रांचे इंधन संपुनही ते बदलून दिले जात नाही.अनेकांना बोगस बिले पाठवली जातात.अनेकांच्या वीज जोडण्या खंडित होऊनही त्यांना लाखो रुपयांची बिले पाठवली जातात.त्यांना न्यायालयाचे उंबरठे झिजविण्यास भाग पाडले जाते.अनेकांना वीज चोरी पोटी लाखांची बिले देऊन त्यांना न्यायालयात खेचले जाते.चुकीची वीज बिले दिली जातात,दंडाच्या रकमा अवास्तव दाखवल्या जातात.असे आरोप भर सभेत शेतकऱ्यांनी करून तेथील अधिकारी बी.एस.खराटे व दिनेश चावडा यांची बोलती बंद केली.

चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाचे कामास खाणीचे काम आनंदवाडी जवळ सुरु असून त्याचे दगड आपल्या जमिनीत येऊन पडतात.अनेक वेळा तक्रार करूनही महसुलच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही व आपल्या विहिरीचे पाणी लंपास झाल्याचे सांगून आपले गव्हाचे पीक वाया गेल्याचा आरोप केला.क्षमतेपेक्षा खाणीचे काम जास्त खोल केले जात असून ग्रामपंचायतीने महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.खाणीचे पाणी वापरूनही आपल्या पिकाला कुठलाही फायदा झाला नाही.शेजाऱ्यांना नुकसान भरपाई दिली मात्र आपल्याला जाणीवपूर्वक टाळले गेल्याचा आरोप रोहिणी दत्तात्रय होन या महिलेने व तिचे पती दत्तात्रय होन यांनी केला.

त्यानंतर पोलीस विभागाच्या तक्रारी सुरु झाल्या त्यात कोपरगाव नगर परिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी एखाद्या गुन्हेगारासारखे वागणूक देत आहे.अनेक वेळा खोटे गुन्हे दाखल करीत आहे.आपली मुले घटनास्थळी नसताना त्यांना असंबद्ध प्रकरणात गुंतवले जात असल्याचा आरोप करताना आपण लोकप्रतिनिधी असताना आपल्याला अनेक नागरिकांची भांडणे सोडविण्यास जावे लागते मात्र ते करताना नको त्या प्रकरणात आपल्याला गुंतवले जात आहे.आपल्याला हद्दपार करण्यासाठी वारंवार नोटिसा काढल्या जातात. आपल्या मुलांना दरोड्याचा गुन्ह्यात अडकवले जाते,सामान्य माणूस पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतात. आपल्याला विनाकारण चार दिवस जेलमध्ये टाकले असा आरोप करून त्यांनी “मोगलाईची”आठवण करून दिली.आपण या प्रकाराला वैतागलो असून शेवटी आत्महत्या करण्याचा इशारा दिला. शहरात पोलीस अधिकाऱ्यांची दहशत असल्याचा आरोप केला.त्याला उत्तर देण्यासाठी मात्र कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी मात्र उपस्थित नव्हते त्याला उत्तर देण्याची वेळ पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. व्ही.गवसने यांच्यावर आली. त्यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी अनिल कटके यांनी हि जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केल्याशिवाय पोलिसांना कारवाई करताच येत नाही.विनाकारण कुणालाही गजाआड करता येत नाही.तुमचे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे तुमचे वैयक्तिक काय आहे ? याची आम्हाला माहिती नाही.कुठलीही कारवाई तपासाअंती होते.व कागदपत्रे बनविण्याची जबाबदारी हि पोलिसांचीच असते असे रोखठोक उत्तर देऊन मेहमूद सय्यद यांना शांत केले.त्यावेळी पो.कॉ.खारतोडे यांनी हि घटना घडली त्यावेळी पोलीस अधिकारी राकेश मानगावकर हे आठ दिवस रजेवर होते.त्यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या कडे अधिभार असल्याची आठवण करून सय्यद यांचे आरोप परतून लावले.

त्या नंतर महसूल विभागाची झाडाझडती सुरु झाली त्यावेळी चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाचे कामास खाणीचे काम आनंदवाडी जवळ सुरु असून त्याचे दगड आपल्या जमिनीत येऊन पडतात.अनेक वेळा तक्रार करूनही महसुलच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही व आपल्या विहिरीचे पाणी लंपास झाल्याचे सांगून आपले गव्हाचे पीक वाया गेल्याचा आरोप केला.क्षमतेपेक्षा खाणीचे काम जास्त खोल केले जात असून ग्रामपंचायतीने महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.खाणीचे पाणी वापरूनही आपल्या पिकाला कुठलाही फायदा झाला नाही.शेजाऱ्यांना नुकसान भरपाई दिली मात्र आपल्याला जाणीवपूर्वक टाळले गेल्याचा आरोप रोहिणी दत्तात्रय होन या महिलेने व तिचे पती दत्तात्रय होन यांनी केला.त्याला कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी उत्तर देताना,”हि खाण चांदेकसारे ग्रामपंचायतीने “ना हरकत” दिल्याशिवाय सुरु केलेली नाही.तिला जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिली आहे.तुमचे क्षेत्र या खाणी पासून वरच्या बाजूला आहे.तेथपर्यंत नुकसान होत नाही ज्यांचे नुकसान होते त्यांना नुकसान भरपाई दिली आहे.असा दावा केला.मात्र तक्रारदार महिलेने हा विषय लावून धरला व आपली जमीन खाणीपासून पाचशे फुटाच्या आत असल्याचा दावा केला. अखेर आपल्याला नुकसान भरपाई द्यावीच लागेल असा दावा ठोकला.त्याला अखेर महसूल अधिकाऱ्यांना नमते घेऊन त्यांनी तुमचा जागेवर येऊन आपण पंचनामा करण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

यावेळी पोहेगाव येथील शेतकरी किशोर रोहमारे यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावरून आपली नावे गाव तलाठ्याने परस्पर कमी केली असल्याचा आरोप केला.व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.त्यावेळी तहसीलदार चंद्रे यांनी या बाबत,” तुम्ही मंडलाधिकारी यांचेकडे अपिलात जा,सुनावणी करा” असा सल्ला दिला.मात्र चुकीचे काम करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ केल्याने रोहमारे यांनी चुका करणाऱ्याला अभय देऊ नका.चुका महसूल कर्मचाऱ्यांनी करायच्या व त्याचे मूल्य शेतकऱ्यांनी का चूकवायचे ? असा रास्त सवाल केला.दरम्यान तालुक्यातही या सारख्याच अनेक गावात अशा घटना घडल्या असून या कर्मचाऱ्यांना अभय देता काम नये अशी मागणी लावून धरली.या प्रकरणानंतर आलेल्या नागरिकांनी आ. काळे यांचे भोवती एकच गर्दी केली व त्यांनी अनेकवेळा आवाहन करूनही तक्रारदार व नागरिक आपल्या जागेवर बसण्यास तयार नव्हते.अखेर पत्रकार व नागरिकांनी वैतागून निघून जाणे पसंत केले.अनेक शेतकऱ्यांना महिलांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळूनही त्यांना आपल्या समस्या न मांडताच आल्या पावली परत फिरावे लागले आहे.या बाबत अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनी व महसूल या बाबत जास्त तक्रारी असल्याने या विभागाच्या स्वतंत्र बैठक घेण्याची पुन्हा मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close