जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात ६८ गावात कर्ज माफी लागू-तहसीलदार चंद्रे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ जाहीर केलेली आहे. सदर योजनेत सप्टेंबर २०१९ अखेर थकीत पीक कर्ज व व्याज मिळून रुपये दोन लाख पर्यंत असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेची सुरुवात २१ फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातील ६८ गावांमध्ये सुरू झाली असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात सदर सुरुवात ही २८ फेब्रुवारी या दिवशी सुरू होणार आहे. २८ फेब्रुवारी या दिवशी कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. सदर याद्या शेतकऱ्यांना जिल्हा बँक, राष्ट्रीय कृत बँक, सर्व आपले सरकार केंद्र येथे पाहावयास मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनी यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना बँकेत किंवा आपले सरकार केंद्रावर जाताना आधार कार्ड बचत खाते ज्यामध्ये आपण घेतलेल्या कर्जाचा तपशिल असेल व विशिष्ट क्रमांक जो आपणाला बँकेमधून मिळेल हे सर्व सोबत घेऊन जावे. सदर आधार प्रमाणीकरणासाठी आपण ज्या बँकेतून कर्ज घेतलेले आहे त्या बँकेकडे किंवा आपले सरकार केंद्र स्थानी जाऊ शकतात.

सदर योजनेत आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा सध्या निश्चित केलेली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. तसेच बँकेत किंवा सेतू केंद्रावर झुंबड किंवा गर्दी करू नये. आपल्या कर्जमुक्तीचा लाभ व्यवस्थितपणे मिळावा यासाठी व्यवस्थित आधार प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. आपल्याला पोर्टलवर आपली कर्जमाफीची रक्कम दाखविण्यात येईल. ती आपल्या मान्य असल्यास तसेच आपले आधार कार्डवरील नाव योग्य असल्यास मान्य करून आधार प्रमाणीकरण करावे व पावती घ्यावी. मान्य नसेल तर अमान्य म्हणावे व पावती घेऊन जिल्हास्तरीय समितीकडे द्यावे. सदर प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असल्याने शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता व कालमर्यादा नसल्याने बँका व आपले सरकार केंद्रावर गर्दी न करता व्यवस्थित आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहनही तहसीलदार चंद्रे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close