जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुका पोलिसानी केले पाच आरोपी गजाआड ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका पोलिसानी नुकतेच सांगवी भुसार येथील ट्रॅक्टरने दुचाकी पाडल्याच्या कारणावरून हाणामारी करून दोन जखमी केल्याच्या कारणावरून त्याच गावातील आरोपी मच्छीन्द्र जयराम शिंदे, सुनील जयराम शिंदे, अजय मच्छीन्द्र शिंदे, सुजय सुनील शिंदे, शिवानंद पांडुरंग शिंदे आदी पाच आरोपीना नुकतेच अटक करून कोपरगाव येथिल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रं.३ चे न्यायाधीश श्री डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता त्यांनी आरोपींना एक लाख रुपयांच्या जामीनाशिवाय सोडण्यास नकार दिल्याने आरोपीना पुन्हा जेलची हवा खाण्याचा अनास्था प्रसंग गुदरल्याची घटना समोर आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील फिर्यादी शेतकरी राधाकृष्ण बाबुराव जाधव(वय-५५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी गुन्हा दाखल करून त्या फिर्यादीत त्याच गावातील वरील नावाचे आरोपी यांनी आपल्या शेतात गैर कायद्याची मंडळी जमवून अनाधिकाराने आपल्या शेतात येऊन आरोप केला कि,”तुम्ही ट्रॅक्टरने आमची दुचाकी का पाडली ? असे म्हणून शिवीगाळ करून हातातील लोखंडी टॉमी, काठी, गज, दगड, यांनी फिर्यादी राधाकृष्ण जाधव व त्यांचा मुलगा मयूर जाधव यांना जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.व तुमचा खून करून टाकू अशी धमकी दिली होती.त्यावर फिर्यादि राधाकृष्ण जाधव यांनी कोपरगाव तालुका पोलिसानी आरोपी मच्छीन्द्र शिंदे, सुनील शिंदे,अजय शिंदे, सुजय शिंदे, शिवानंद शिंदे,आदी पाच जणांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.५१/२०२० भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३२६,४४७,३२३,५०४,५०६ प्रमाणे वरील नावाच्या पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्यावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपींच्या शोधात होते.

दरम्यान पोलिसानी नुकतेच आरोपीना अटक करून कोपरगाव प्रथम वर्ग दंडाधिकारी क्रं.३ चे नयायाधीश श्री डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता आरोपींच्या वकिलांनी त्यांना जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती,त्यावर न्यायालयाने त्यांना एक लाखांच्या जामीनाशिवाय सुटका करण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.व त्यांना न्यायिक कोठडीत त्यांची रवानगी केली आहे.त्या मुळें किरकोळ कारणावरून समोरच्या व्यक्तीवर दांडगाई करणाऱ्या ग्रामीण गुन्हेगार प्रवृत्तीच्या ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसानी या प्रकरणी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यारे जप्त केले असून ते न्यायालयासमोर हजर केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर, प्रदीप काशीद,किशोर कुळधर आदी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close