जाहिरात-9423439946
खेळजगत

आत्मा मालिक मैदानावर ६५ वी १४ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

बोर्ड वेल्फेअर सोसायटी व सी.बी.एस.ई,डब्ल्यू एस.ओ.आयोजित व स्पोर्ट फॉर ऑल फाउंडेशन आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल व आत्मा मलिक क्रिकेट कॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ६५व्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मलिक क्रिकेट कॅडमी मैदानावर रंगारंग कार्यक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव व सी.बी.एस.ई.मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मिश्रा तसेच प्रमुख पाहुणे संजय भारद्वाज माजी भारतीय गोलंदाज पारस म्हात्रे ,क्रीडा अधिकारी सुभाष नावंदे,शकील खान ,मनीष दिवाकर, कपिल वस्ती बरोबर महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ (रणजी) तसेच आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त मोहनराव शेलार, उमेश जाधव ,विलास पाटील, अभिषेक पाटील व आयोजन सचिव सौरव वेताळ आदि मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत देशभरातील २८ घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश हे सर्व संघ सहभागी झाले असून साखळी पद्धतीने स्पर्धा खेळवली जाणार आहे


स्पर्धेचे उद्घाटन एस.जी.एफ.आई. चा ध्वज व सर्व खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली व सुरुवात झाली दरम्यान प्रमुख पाहुणे प्रदीप मिष्रा यांनी नवनवीन क्रिकेटचे शालेय मुलांसाठी येणारे उपक्रम समजावून सांगितले व राष्ट्रीय स्तरावरून चांगल्या मुलांची निवड करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनण्यासाठी लागणारी मदत करू अशी ग्वाही दिली. तसेच सन्माननीय द्रोणाचार्य पुरस्कार विजेते व भारतीय खेळाडू गौतम गंभीर यांचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी खेळाडूंना खेळाबरोबर अभ्यासाची ही जोड ठेवाल तर बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या आपण सक्षम असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळू शकत नाही किंवा खेळायची असेल तर क्रिकेट बरोबर शिक्षणावरही भर द्या असा संदेश दिला तसेच या अयोजना संदर्भात अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांना धन्यवाद दिले तसेच अध्यक्ष सूर्यवंशी साहेबांनी मुलांना खेळाचे महत्व सांगून चांगल्या आयोजनाची ग्वाही दिली खेळाडूंना एकाग्रतेसाठी ध्यानाचे महत्त्व सांगितले व सदर स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा प्रथमत दिवस रात्र पद्धतीने खेळविण्यात येत असून पाच दिवसात ५० सामने खेळविले जाणार आहे. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश संघाने गुजरात संघावर गड्यांनी , राजस्थान संघाने उत्तराखंड संघावर ३५ धावांनी सीआयसी सी संघाने जम्मू-काश्मीर संघावर नऊ गड्यांनी, दिल्ली संघाने महाराष्ट्रावर चार धावांनी, पश्चिम बंगाल संघाने दिव दमन संघावर ५१ धावांनी, चंदीगड संघाने कर्नाटक संघाचा ३८ धावांनी, तेलंगणा संघाने गोवा संघाचा अठरा धावांनी, एनीवे संघाने तामिळनाडू संघाचा छत्तीसगड संघाने मध्यप्रदेश संघाचा ५४ धावांनी सी.आय.एस. सी. इ. संघाने सी.बी.एस.ई,डब्ल्यू एस.ओ.संघाना भेटले धावांनी मध्यप्रदेश संघाने तामिळनाडू संघाचा ४२ धावांनी पंजाब संघाने हरियाणा संघाचा आंध्रप्रदेश संघाने बंगाल संघाचा ७६ धावांनी पराभव केला

स्पर्धा यशस्वीतेसाठी अजित पवार, संदीप बोळीज, अमोल गायकवाड पंकज पाटील सर्व सहकारी स्टेज व्यवस्था अजित पवार, रूपाली आहेर, योगेश निळे, नितीन सोळंकी निवास व्यवस्था शशेद्र त्रिपाटी, दिपक थोरात, निलेश भोंगळे, वाहतूक व्यवस्था विश्वास बारवकर, गणेश म्हस्के भोजन व्यवस्था नितीन शिंदे , वाघुले उमेश परिश्रम घेत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close