नगर जिल्हा
राधाबाई काळे विद्यालयात शिवजयंती साजरी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
या शिव जयंती निमित्त महाराष्टासह देशभरात ठिकठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील राधाबाई काळे कन्याविद्यामंदिरात “शिवजयंती”उत्साहात पार पडली. विद्यालयाच्या प्राचार्या काकडे छाया यांच्या हस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्रीमती पाटील एस .एच. यांच्या मार्गदर्शनाखाली इ ५ वी ‘क’ गुरुकुल च्या विदयार्थ्यांनिंनी श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित पोवाडा सादर केला.याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश मोरे यांनी महाराजांच्या कार्याचा उलगडा आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केला. याप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापिका काकडे छाया, उपमुख्याध्यापक गोडे मधुकर,पर्यवेक्षक मोरे रमेश,कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख काकडे अंगद, सर्व सेवकरूंद व पालक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन इ.पाचवी ‘क’ मधील विद्यार्थीनी कु. श्रद्धा मोरे व कु. समीक्षा अमराळे यांनी केले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us