जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रयत मधून मूल्य जपणारा विद्यार्थी घडतो-डॉ.चासकर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण देण्याची क्षमता रयत शिक्षण संस्थेमध्ये असून ज्ञानाचा वापर कोठे, कसा व कोणत्या स्वरूपातून व्हावा हे बाळकडू रयत शिक्षण संस्थेत मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपली ओळख वाढविण्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्कार फार मोलाचे ठरत असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्र आणि विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात केले आहे.

या कार्यक्रमात बी.ए., बी.काम., बी.एस्सी व बी.बी.ए. च्या स्नातकांनी पदवी ग्रहण केली. यावेळी कोपरगाव परिसरातील पालक,स्नातक विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयामध्ये आयोजित पद्वीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे हे होते.या कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप वर्पे, सुनिल गंगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,विद्यार्थ्यांनी उच्च ध्येयाची स्वप्न पहावीत. ध्येयपुर्तीचे नियोजन करूनच आपले ध्येय साध्य करता येत असल्याचा आत्मविश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात शंकरराव कोल्हे यांनी सांगितले की, समाज विकासामध्ये रयत शिक्षण संस्थेचे फार मोठे योगदान आहे. संस्थेने समाजाकरिता अनेक कुशल माणसं घडविली याचा सार्थ अभिमान आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ.रामदास पवार यांनी करून दिला. सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सावंत, प्रा.छाया शिंदे यांनी केले व आभार प्रा.रमेश झरेकर यांनी मानले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उपप्राचार्य प्रा. दिलीप सोनवणे, डॉ.विजय निकम व प्रा.सुभाष देशमुख, डॉ.गणेश विधाटे, डॉ.चंद्रभान चौधरी, डॉ.कैलास महाले डॉ.राजाराम कानडे अधीक्षक श्री.वसंतराव पवार आदींचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close