जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी तीन चोऱ्या,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बक्तरपूर रस्त्यावरील रोडलगत मराठी शाळेजवळ रहिवाशी असलेल्या फिर्यादी प्रवीण देविदास कहार (वय-३१) यांच्या टपरीजवळ असलेल्या शटरच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यानी कपाटातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.तर आपेगाव येथून पाच हजाराची पाणबुडी केबलसह,तर रावंदे येथून उत्सव मंगल कार्यालयातून ऋत्विक सांगळे यांचा आठ हजारांचा भ्रमणध्वनी लंपास केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वर्तमानात कोरोना साथीने पुन्हा थैमान घातले आहे.त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थ आपल्या घराचा आसरा घेताना दिसतात.याच संधीचा फायदा उचलून चोरटे आपले इसिप्त साध्य करताना दिसत आहे त्याचाच अनुभव चासनळीत आला आहे.दरम्यान आणखी दोन घटनात एका ठिकाणी फिर्यादी ऋतिक संदीप सांगळे रा.सोनारी यांचा रवंदा गावातून उत्सव मंगल कार्यालयातून आठ हजार रुपये किंमतीचा भ्रमणध्वनी तर आपेगाव येथून सुनीता बाळासाहेब गव्हाळे यांच्या ग.क्रं.२१ मधील विहिरीतून ५ हजार रुपये किमतीची पाणबुडी मोटार केबलसह अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात कोरोना साथीने पुन्हा थैमान घातले आहे.त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थ आपल्या घराचा आसरा घेताना दिसतात.याच संधीचा फायदा उचलून चोरटे आपले इसिप्त साध्य करताना दिसत आहे.कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीतही याचाच दाहक अनुभव फिर्यादी प्रवीण कहार यांना नुकताच आला आहे.ते आपले बक्तरपूर रोडवरील आपले दुकान बंद करून गेले असता आज पहाटे एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने संधी साधत लाकडी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून ४० हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे मंगळसूत्र,१० हजार रुपये रोख व दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ४० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७८/२०२१ भा.द.वि.कलम ४६१,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पी.बी.काशीद हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close