जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत प्रजाकसत्ताक दिन साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारताचा प्रजासत्ताक दिन नुकताच प्रमुख नेते आ.आशुतोष काळे व माजी आ.कोल्हे व तहसीलदार विजय बोरुडे यांच्या अनुपस्थितीत तर श्रीरामपूरचे प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.स्वातंत्र्यानंतर एवढे प्रमुख मान्यवर अनुपस्थितीत असताना हा बहुदा पहिलाच कार्यक्रम असावा असे मानले जात आहे.

दरम्यान प्रजासत्ताक दिनी कोपरगाव तालुका पोलीस ठण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपकारागृहातील कैद्यांची भेट देवून त्यांची विचारपूस करून त्यांना मिठाई देवून कैद्यांचे समुपदेशन केले.त्यांचेतून गुन्हेगारी वर्तणूक कसी सुधारेल व कमी करता येईल या करिता एक तास त्यांचे सोबत राहून त्यांचे मनपरिवर्तनासाठी मार्गदर्शन केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यांच्या सोबत उपकारागृह अधीक्षक चंद्रशेखर कुलथे उपस्थित होते.

भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.या दिवसाचे औचित्य साधून काल सकाळी नवी दिल्लीत राजपथवर भारतीय संस्कृती आणि लष्कराच्या ताकतीचं दर्शन घडवण्यात आलं.तर संध्याकाळी विजय चौकात एक हजार ड्रोन्सच्या सहाय्याने रोषणाई करण्यात आली.त्यामुळे विजय चौक चांगलाच उजाळून निघाला आहे.मात्र कोपरगाव तालुक्यात प्रमुख समजला जाणारा प्रजासत्ताक दिन पहिल्यांदाच प्रमुख मान्यवरांच्या अनुपस्थितीत संपन्न झाला आहे.मात्र तरीही या कार्यक्रमास प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी ध्वज फडकावला आहे.

सदर प्रसंगी संजीवनी सहकारी कारखाण्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा ,उपसभापती अर्जुन काळे,कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी शांताराम गोसावी,पंचायत समिती सदस्य,काही जिल्हा परिषद सदस्य,काही मुदत संपलेले नगरसेवक,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,तालुक्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,वनीकरण विभागाच्या लागवड अधिकारी पूजा रक्ताटे,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत नागरे,भरत दाते,समाजाईक कार्यकर्ते संजय काळे,माजी नगरसेवक विरेन बोरावके,संजय जगताप,मेहमूद सय्यद,रमेश गवळी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान बाकी सोपस्कारास जमाव बंदीचे कलम १४४ लागू असल्याने फाटा देण्यात आला होता.जास्त गर्दी या कार्यक्रमास नव्हती.मात्र प्रभारी तहसीलदार यांनी चहा पाण्याचा कार्यक्रमास बोलावले होते मात्र बहुतेकांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान या प्रजासत्ताक दिनी विशेषत्वाने आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आदी प्रमुख मान्यवर अनुपस्थित होते.यात बहुतेक कोरोना साथीची बाधा झाल्याने ते अनुपस्थित असल्याची माहिती आहे.तर कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे विश्रांतीनंतर नूकतेच या साथीतून सावरले असून त्यांची उपस्थिती होती.तथापि माजी आ.कोल्हे यांच्या बाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close