जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावात शिक्षकांनी शाळेला घेतला दूरदर्शन संच

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव बेट येथील कोपरगाव नगरपालिका शाळा क्र.५ या प्राथमिक शाळेतील चार शिक्षकांनी शाळेकरिता ४३ इंची दूरदर्शन संच (अँड्रॉइड स्मार्ट टी.व्ही.)खरेदी केला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता येणार असल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे आपण जे शिक्षण आपल्या शिक्षकाकडून फळा आणि पुस्तकांच्या माध्यमातून शाळा किंवा महाविद्यालयाच्या वर्गात मिळवत होतो तेच शिक्षण आज आपण संगणक,मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या प्राप्त करतो यालाच ऑनलाईन शिक्षण म्हणतात.आज कोरोना साथीच्या पार्श्वभूमीमुळे गत दोन वर्षापासून शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.या पार्श्वभामीवर ऑनलाइन शिक्षणाचे महत्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर हि मदत महत्वपूर्ण आणली जात आहे.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे आपण जे शिक्षण आपल्या शिक्षकाकडून फळा आणि पुस्तकांच्या माध्यमातून शाळा किंवा महाविद्यालयाच्या वर्गात मिळवत होतो तेच शिक्षण आज आपण संगणक,मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या प्राप्त करतो यालाच ऑनलाईन शिक्षण म्हणतात.आज कोरोना साथीच्या पार्श्वभूमीमुळे गत दोन वर्षापासून शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.या पार्श्वभामीवर ऑनलाइन शिक्षणाचे महत्व वाढले आहे.त्यामुळे मुलांना घरी राहून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ झाले आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मुलांना अँड्रॉइड स्मार्ट टी.व्ही.खरेदी केला असल्याने पालक आणि विदयार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव नगरपालिका शाळा क्र.पाच ही बेट भागात स्थापन केलेली प्राथमिक शाळा आहे.शाळेची स्थापना १८ डिसेंबर १९१७ ची असून शाळेत गोरगरीब पालकांची मुले शिक्षण घेतात.काळानुरूप शिक्षणात बदल होत गेले.अनेक इंग्रजी,सेमी व सी.बी.एस.ई.माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या.तशी मराठी शाळेची पटसंख्या कमी होत गेली.अशा बदलत्या शिक्षण पद्धतीत सरकारी मराठी माध्यमाच्या शाळांना व शिक्षकांना आपल्यात शैक्षणिक तंत्रज्ञानात व भौतिक सुविधा यात विकास करावा लागला.गोरगरीब मुलांनाही उच्च प्रतीचे नावीन्यपूर्ण व जगातल्या विविध शैक्षणिक अनुभूती प्राप्त व्हावी याकरिता सर्व शिक्षक आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण घेऊन विविध साधनाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवत असतात.इतर माध्यमाच्या शाळा बरोबरीने शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावे या हेतूने दा्तृत्व दाखवत शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने टी.व्ही.खरेदी केला आहे.
त्यात शिक्षक विलास माळी,सुनिल रहाणे,नसरीन इनामदार व अमोल कडू.प्रजासत्ताक दिनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती कावेरी शिंदे व सदस्य भाऊसाहेब शिंदे,डी.एन.आव्हाड,सुवर्णा मतकर,अश्विनी रक्ताटे,रेखा परदेशी,गोविंद गोधडे आदींचा समावेश आहे.तो त्यांनी त्यांच्या हस्ते टी.व्ही.शाळेला सुपूर्द केला आहे.
सदर प्रसंगी या प्रसंगी लीलावती जमधडे,आशालता शिंदे,मोरे ताई,काळे ताई,आव्हाड ताई,गोपाळ कोळी,सनी गायकर,संतोष मतकर,शोभा साळुंके,प्रकाश साळुंके,अर्चना वाघमारे,वर्षा वाघमारे, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.गिते ताईंनी शाळे विषयी मनोगत व्यक्त केले.अनुप कातकडे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले व उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close