गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात धाडसी चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या तुषार भानुदास म्हस्के (वय-३३) यांच्या घरी ते आपल्या कुटुंबासह पाथर्डी येथील मोहटा देवी दर्शनासाठी गेलेले असताना कोणातरी अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेऊन बंद घराचे कडी कुलूप तोडून आतील सोन्याचे गंठण व विविध दागिने असा ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या धाडसी चोरीत एक तोळा वजनाचे काळ्या मण्याचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे सोन्याचे १७ हजार ५०० रुपये किमतीचे मिनी गंठण,दहा ग्रॅम वजनाच्या दोन हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या अंगठ्या,याशिवाय पाचशे,दोनशे शंभर रुपये दराच्या नोटा असे मिळून २० हजार रुपये रोख असा मिळून एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी तुषार म्हस्के हे आपल्या कुटुंबासह पाथर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी रविवार दि.२३ जानेवारी रोजी सकाळी गेले असताना त्यांच्या घरावर कोणी तरी अज्ञात चोरट्याने पाळत ठेवली होती.व घरा जवळ कोणी नाही.हि संधी साधून रात्री दहा वाजे नंतर कधीतरी त्यांच्या घराचे कुलूप-कडी तोडून आतील लाकडी कापटाचे लॉकर मधील ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने पळवून नेले आहे.
त्यात एक तोळा वजनाचे काळ्या मण्याचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे सोन्याचे १७ हजार ५०० रुपये किमतीचे मिनी गंठण,दहा ग्रॅम वजनाच्या दोन हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या अंगठ्या,याशिवाय पाचशे,दोनशे शंभर रुपये दराच्या नोटा असे मिळून २० हजार रुपये रोख असा मिळून एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी त्यांनी देव देव करून आल्यावर घरी आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला.त्यांनी तातडीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी उपपोलीस निरीक्षक भरत दाते,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१५/२०२२ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.