कोपरगाव तालुका
जिल्हा परिषदेचा विद्यार्थी खाजगी शाळांच्या बरोबरीने घडावा – ना. राजश्री घुले
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील असून स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मागे राहू नये. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्याच्या बरोबरीने घडला जावा असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्री घुले यांनी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य मनापसून काम करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेपर्यंत विकास पोहोचला आहे. ब्राम्हणगाव गटात देखील मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार, जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार-आ. काळे
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतन इमारतीचे उदघाटन व ब्राम्हणगाव गटातील बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्री घुले यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे होते.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,विमलताई आगवण, सुधाकर दंडवते, सोनाली साबळे, पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, माजी सभापती अनुसया होन,सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके,वर्षा दाणे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक विठ्ठल आसने, संजय आगवण, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, गोरक्षनाथ जामदार, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपअभियंता उत्तम पवार, केंद्र प्रमुख दिलीप ढेपले, आदी मान्यवरासह करंजी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असतांना जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी. शेतकऱ्यांची मुले घडवायची असेल तर त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान मिळालेच पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भावी पिढीच्या सक्षमीकरणासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जात असून बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडत असून विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य वृंद्धिगत होत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी प्रयत्नशील असून पुढील वर्षीच्या नियोजनामध्ये शाळा खोल्यांच्या निधी उपलब्धतेसाठी प्राधान्य दिले आहे. त्याबाबत पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली असून त्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे ना. घुले यांनी शेवटी सांगितले.
यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, काळे परिवाराचे व करंजी गावाचे जुने ऋणानुबंध आहेत. करंजी व परिसरातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी मा. खा. कर्मवीर शंकरराव काळे दोन एकर जागा घेवून देत रयत शिक्षण संस्थेच्या शाळेची इमारत बांधून दिली. जिल्हा परिषद-पंचायत समितीची सत्ता परिवर्तन झाल्यापासून ग्रामीण भागात विकास होत असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, जी.प. सदस्य राजेश परजणे यांनी मनोगत व्यक्त केले.