जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सोमवारी आ.आशुतोष काळेंचा कोपरगावात दुसरा जनता दरबार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांचे सर्व शासकीय कार्यालयातील कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी जनता मागील महिन्यात जनता दरबार घेतला होता. या जनता दरबारातअनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांचा इतका भडिमार करण्यात आला होता कि हा जनता दरबार आ. काळे यांना वेळेअभावी आवरता घ्यावा लागला होता.त्यामुळे महावितरणसह नागरिकांचे अनेक प्रश्न तसेच अनुत्तरित राहिले होते ते सोडविण्यासाठी त्यांनी येत्या सोमवार दि.१० रोजी सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालय येथे जनता दरबार घेणार आहे. आपल्या समस्या मांडण्यासाठी या जनता दरबारासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्याची अवस्था,” नाव मोठे अन लक्षण खोटे” अशीच झाल्याचे अनेक वर्षाचे अनुभवावरून म्हणता येईल गत अनेक वर्षात फुकांच्या घोषणांचा नुसता सुकाळ होता.वास्तविक जमिनीवर मात्र कृतीची वानवा दिसून येत होती.त्यात रस्ते,पिण्याचे पाणी,प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,महावितरण,महसूल,अवकाळी पावसाची नुकसान भरपाई,रेशन, सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्वच स्तरातील सर्वसामान्य नागरिकांचे विविध शासकीय कार्यालयात रखडलेले प्रश्न आदींचा समावेश होता.

कोपरगाव तालुक्यात अनेक वर्षांपासून पायाभूत विकासाचा अनुशेष बाकी असून त्यात रस्ते,पिण्याचे पाणी,प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,महावितरण,महसूल,अवकाळी पावसाची नुकसान भरपाई,रेशन, सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्वच स्तरातील सर्वसामान्य नागरिकांचे विविध शासकीय कार्यालयात रखडलेले प्रश्न आदींचा समावेश होतो.हे प्रश्न तातडीने सुटावे यासाठी आ. काळे यांनी मतदार संघातील जनतेसाठी जनता दरबार हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मागील महिन्यात घेतलेल्या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करून या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी आ. आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या होत्या. जवळपास तीन तासापेक्षा जास्त चाललेल्या या जनता दरबारात नागरिकांनी महावितरण, महसूल, आरोग्य, एस. टी. महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारींकडे आ. आशुतोष काळे यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना समज देवून नागरिकांची अडवणूक न करता त्यांचे प्रश्न तातडीने सोडवाव्या अशा सूचना आ. काळे यांनी दिल्या होत्या. ज्याप्रमाणे कोपरगाव येथे जनता दरबार घेवून कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत झाली असल्याने व आपले कोणीतरी किमान ऐकून तरी घेते हा विश्वास नागरिकांना बरेच काही देऊन जात आहे.त्याप्रमाणे कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील करा गावातील नागरिकांसाठी आ. आशुतोष काळे यांनी नुकताच राहाता पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेतला त्यावेळीही त्या जनता दरबारासाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून आपल्या समस्या मांडल्या होत्या. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सुटू शकण्याची शक्यता वाढीस लागल्यामुळे या जनता दरबाराला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close