कोपरगाव तालुका
कोपरगाव न्यायालय इमारत स्थलांतरित करण्यासाठी ३७ लाखांचा निधी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झाली असून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी निधीची मागणी कोपरगावसाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पाच न्यायालये स्थलांतरीत करण्यासाठी येणाऱ्या रुपये ६२ लाख ६० हजार १०० रुपयांचा निधीस विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यासाठी ३७ लाख ५२ हजार ७०६ रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
नव्याने मिळालेल्या निधीतून वर्तमान न्यायालयीन कामकाज करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीत त्यांचे दप्तर हलविण्यात येणार आहे.त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे आदेश प्राप्त झाले असल्याची माहितीही आ. आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) कोपरगाव यांची दोन न्यायालये व दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) कोपरगाव यांची तीन न्यायालये अशा पाच न्यायालयांच्या इमारतीचें आयुष्य जवळपास शंभर वर्षाहून अधिक झाले होते त्यातून त्या जीर्ण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी आ. आशुतोष काळे यांच्याकडे आल्या होत्या. त्याबाबत या न्यायालयीन इमारतीची पाहणी त्यांनी नुकतीच केली होती केली.उच्च न्यायालयाच्या इन्फास्ट्रक्चर कम बिल्डींग समितीने कोपरगाव न्यायालयाच्या जुन्या इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत बांधणे बाबतचा जिल्हा व सत्र न्यायालय यांचा प्रस्ताव मान्य देखील केलेला होता. मात्र निधी उपलब्ध होत नव्हता. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आ.काळे यांनी पाठपुरावा सुरु केला होता.
त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची मागणी केली होती. तसेच मदत पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखील पाठपुरावा करून पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांना भेटून न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची मागणी केली होती. आ.आशुतोष काळेंच्या या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले असुन लवकरच या न्यायालयाच्या इमारती बांधल्या जाणार आहे. त्यासाठी या पाच न्यायालयाच्या इमारतींचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हा न्यायालय कोपरगाव येथील नवीन इमारतीमध्ये दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांची दोन न्यायालये व दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) कोपरगाव यांची तीन न्यायालये अशी एकूण पाच न्यायालये स्थलांतरित करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या इमारती स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या ६२ लाख ६० लाख १०० रुपये खर्चास मंजुरी मिळविण्यात आ.काळे यांना यश मिळाले आहे. या पूर्वी माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा करून जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत बांधण्यात यश मिळविले होते.