जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावल्याने महिलांत समाधान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील अनेक वर्ष कोपरगाव शहरातीला नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या सोडविण्यात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांना यश आले असून त्यांनी दिलेला शब्द पाळून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी जिजाऊ महिला मंडळाच्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की,पाणी प्रश्न किती महत्वाचा आहे महिलांना चांगले माहित आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी साठवण तलाव क्र ५ व वितरण व्यवस्थेसाठी १२३ कोटी रुपये निधीला आ. आशुतोष काळे यांनी तांत्रिक मंजुरी मिळविली. प्रकल्प मान्यता समितीने देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु होवून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार आहे. हि कोपरगावच्या नागरिकांच्या दृष्टीने व महिला भगिनींसाठी अतिशय समाधानाची गोष्ट असल्याचे सांगितले.

यावेळी जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा पानगव्हाणे,स्वप्नजा वाबळे,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,माधवी वाकचौरे,पूजा देशमुख,रुपाली भोकरे,वर्षा कापसे,आरती शिंदे,डॉ.मंजुषा गायकवाड,रश्मी कडू,वैशाली डोखे,डॉ.अनिता मगर,जयश्री कवडे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close