जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दुचाकीच्या अपघातात एक ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुली वर्तमानात अपघाताचे ठिकाण बनला असून अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली असून नुकताच एक दुचाकींचा अपघात प्रकाशझोतात आला असून यात काजगाव ता.भडगाव जिल्हा जळगाव येथील इसम शामकांत भिकन भोई (वय-४४) हे गंभीर रित्या जखमी होऊन उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले आहे.तर त्याच गावातील त्यांचा सहप्रवासी आनंदा बुधा मोरे (वय-५२) हे गंभीर जखमी झाल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने या चौफुलीवर सिग्नल व्यवस्था बसविण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान पुणतांबा चौफुलीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गतिरोधक बसवून त्याठिकाणी एक मोठे सर्कल बनवून त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी अशी महातापूर्ण मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुली हि मुंबई-नागपूर,नगर-मनमाड तसेच पुणतांबा अशा तीन रस्त्यांची बनली असून याच मुंबई-नागपूर महामार्गाला समांतर मार्ग म्हणून समृद्धी महामार्ग सध्या जोरात सुरु आहे.या तिन्ही मार्गावर वर्तमानात लहान मोठ्या वाहनांची मोठी वर्दळीची गर्दी असते.विशेषतः गुरुवार व शनिवार व रविवार या साई बाबांच्या शिर्डीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या काही निवडक वारी व लग्नतिथी व तत्सम तिथीच्या दिवशी वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात अशा वेळी लहान दुचाकीस्वार हे आपल्या वर्दळीच्या ठिकाणाहून आपली वाहने काढू घेण्यासाठी मोठी कसरत करताना दिसून येतात.त्यातून अपघातांची मोठी मालिकाच निर्माण झाली आहे.चार-दोन दिवसाला या ठिकणी काहीतरी अपघात घडल्याशिवाय रहात नाही.

शुक्रवार दि.३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१९,सी.ई.७०३५) या हिरो पॅशन प्रो दुचाकीवरून शाम कांत भोई व आनंदा भोई हे जात असताना वहानांच्या वर्दळीतून मार्ग काढताना त्यांची एका अनामिक क्षणी घसरली त्यात प्रथम दोघेही जखमी झाले त्यांना उपचारार्थ नजीकच्या आत्मा मालिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि दुचाकीस्वार शामकांत भोई यांचे आत्मा मलिक रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे.

या बाबत फिर्यादी राम गंभीर जावरे (वय-४२) रा.शिंगीशिंदे नगर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.न.५८/२०२० भा.द.वि.कलंम ३०४( ),२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४/१७७ प्रमाणे मयत शामकांत भिकन भोई यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक गवसने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close