कोपरगाव तालुका
सुरेगावात एकावर विनयभंगासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंच्यात हद्दीत एक आदिवासी महिला आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर जेवण करून झोपली असता त्याच गावातील आरोपी संजय शंकर निंबाळकर याने रात्री साडेदहाच्या सुमारास जाऊन महिलेच्या मुलाकडे आधार कार्ड मागण्याचे बहाण्याने जाऊन तिचा विनयभंग केला असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान या घटनेनंतर आरोपीस या महिलेच्या मुलांनी व नजीकच्या नागरिकांनी बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे.रात्री या कुटुंबाने व महिलेच्या पतीने त्याच गावातील एका प्रतिष्ठित नागरिका जवळ आपल्याला प्रकरण वाढवायचे व गुन्हाही दाखल करायचा नाही असे म्हणून सांगितलें असताना पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत माध्यमातील एका इसमाने हा गुन्हा दाखल होण्यात मोलाची भूमिका निभावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या बाबत सुरेगाव व परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहरापासून पश्चिमेस कोळापेवाडी नजीक सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी महिला व आरोपी संजय निंबाळकर हे एकाच गावातील रहिवासी असून फिर्यादी महिला व तीचा पती हे शेतमजूर असून आपला उदरनिर्वाह रोजंदारीने शेतीचे कामे करून करतात.मंगळवार दि.४ फेब्रुवारीच्या रात्री १०.३० वाजता आरोपी तरुण संजय निंबाळकर हा सुरेगाव गावठाण हद्दीत घटनास्थळी गेला व ओट्यावर झोपलेल्या महिलेला तिच्या मुलाचे आधारकार्ड मागण्याचे बहाण्याने जाऊन सदर महिलेला झोपेतून उठवून त्याने तिच्याशी अश्लील टिपणी करून तिचा विनयभंग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सदर महिला आदिवासी समाजाची असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिचा विनयभंग केल्याने फिर्यादी महिलेने आरोपीवर संजय निंबाळकर याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५४,३५४(अ ),सह अनुसूचित जाती जमाती प्र. का.क.-३(१),डब्ल्यू (a ),३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनेनंतर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे करीत आहेत.