जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषद पदाधिकारी,नगरसेवकांना साग्रसंगीत निरोप !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावच्या नेत्यांचे चुकत असेल तर त्यांना सांगण्याचे धाडस नगरसेवक अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले तर त्यांचे नुकसान टळेलच पण नेत्यांचेही नुकसान टळेल मात्र ते धाडस त्यांनी जरूर दाखवले तर कोपरगाव सह तालुक्याचे नुकसान टळेल असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मावळते अध्यक्ष विजय वहाडणे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना उपस्थितांना केले आहे.

“मावळते अध्यक्ष विजय वहाडणे व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेत चांगली कामे केली आहेत.त्यामुळे आगामी निवडणुकीतही त्यांनी निवडुन यावे व जनतेने त्यांना जनहितासाठी स्वीकारावे”-महंत रमेशगिरीजी महाराज,कोपरगाव बेट.

कोपरगाव नगरपरिषद पदाधिकारी,नगरसेवक यांचा निरोप समारंभ महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,भाजप गटनेते रवींद्र बागुल,सेनेचे गटनेते योगेश बागुल,नगरसेवक विजय वाजे,स्वप्नील निखाडे,मेहमूद सय्यद,ऐश्वर्या सातभाई,प्रतिभा शिलेदार,श्रीमती वर्षा गंगूले,वर्षा शिंगाडे,संजय पवार,ताराबाई जपे,दीपाली गिरमे,जनार्दन कदम,सपना मोरे,विद्या सोनवणे,सुवर्णा सोनवणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

नुकत्याच संपलेल्या सभागृहात कमी शिक्षित असूनही अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद व अनिल आव्हाड यांनी महत्वपूर्ण व चांगले काम केल्याची पावती दिली आहे.व त्यांचे अन्य राजकीय नेत्यांसारखें पोटात एक व ओठात एक असे विचार नसल्याने त्यांनी मुक्तपणे व स्वच्छंदपणे सभागृहात काम केल्याचा गौरव मावळते नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव नगरपरिषदेत आपण साठाव्या वर्षी निवडून आलो त्या पूर्वी आपण सामाजिक काम करताना ४२ वर्षात १८वेळा कारागृहात गेलो होतो तेंव्हा कुठे जनतेने आपल्याला स्वीकारले आहे.दरम्यान आपल्यावर आपले वडील व आई यांचे संस्कार झाले आहे.कोपरगावात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले होते.त्यावेळी त्यांनी भोजनानंतर स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः धुवून टाकले होते.हे संस्कार आपण आजही उराशी बाळगले असू आज ६५ व्या वर्षी आपण स्वतः सकाळी उठून व्यायाम करून स्वतःचे कपडे धुण्यासह घराचे अंगण स्वतः झाडत असल्याचे अभिमानाने सांगितले आहे.त्यावेळी समोरील काही खोडसाळ नागरसेवकांनी अजून काय सेवा बजावतात अशी टिपणी केली असता त्यांनी,तेवढ्याच मिश्कीलपणे जर आपल्या आईने जर स्वयंपाक शिकवला असता तर तोही नक्कीच केला असता असे उत्तर देऊन त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे दिलखुलास कौतुक केले आहे.व कोरोना काळात आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जी मोलाची भूमिका बजावली त्याला तोड नाही.त्यांच्यामुळेच शहरातील नागरिक सुरक्षित राहिले असल्याचे गौरवोद्गार काढले असून त्यांचे कार्य नक्कीच आयुष्यभरासाठी लक्षात राहील असे सांगितले आहे.

दरम्यान प्रत्येक सभेत मतभेद दर्शविणाऱ्या या सभागृहात आज आयोजित साग्रसंगीत निरोप समारंभात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व प्रशासनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे एकमुखाने कोडकौतुक केले आहे हे विशेष!त्या वेळी उपस्थित नागरसेवकांनी नाचून आपला आनंद व्यक्त करून समारोप केला आहे.

पाच वर्षे काम करताना आपण कोरोनाचे भीतीपोटी आपल्या नातलगांना भेटत नसताना स्वछता विभागाचे कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छतेसाठी जे अतुलनीय योगदान दिले ते अविस्मरणीय असून त्यांच्यामुळे शहराला देशपातळीवर नेऊन ठेवले आहे.त्यामुळे शहरात त्यांचा एखादा पुतळा असावा व ते काम आपल्याकडून अपूर्ण राहिले अशी खंत व्यक्त केली असून त्या साठी आपण आगामी काळात प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला आहे.व आगामी काळात आता आपण नगरपरिषद कामातून कार्यमुक्त होत असून आपण पुन्हा एकदा पाच वर्षे खंडित झालेलं आंदोलने सुरू करू असे सांगून उपस्थितांना आगामी काळातील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.आपल्या राजकीय आयुष्यात कधीही काही विचार दाबून ठेवले नाही.ते दाबले तर अनेक व्याधी माणसावर आक्रमण करतात त्यामुळे उपस्थितांनी काम करताना तुम्ही मनातून मुक्त व्हा तरच आरोग्य सुस्थितीत राहाते असे आवाहन केले आहे.त्यावेळी त्यांनी कमी शिक्षित असूनही अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद व अनिल आव्हाड यांनी महत्वपूर्ण व चांगले काम केल्याची पावती दिली आहे.व त्यांचे अन्य राजकीय नेत्यांसारखें पोटात एक व ओठात एक असे विचार नसल्याने त्यांनी मुक्तपणे व स्वच्छंदपणे सभागृहात काम केल्याचा गौरव केला आहे.आगामी नगरपरिषद निवडणुकीत आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की,आपले कार्यकर्ते ज्या प्रभागातून जो आदेश देतील व ज्या प्रभागातून आपण निवडणूक लढवु असे सांगून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे म्हटले जात आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी पदाधिकाऱ्यांना आपण हा निरोप देत नसून त्यांचे त्यांनी हे स्वागत समजावे असे आवाहन केले आहे.सत्येनं मुंदडा यांनी बरीच कामे राहून गेल्याचे शल्य बोलून दाखवले गाळ काढण्याचे योगदान देता आले व ज्यांनी सहकार्य केले त्या अधिकारी पदाधिकारी,प्रशासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे.त्यावेळी त्यांना गहिवरून आले होते.सदर प्रसंगी कैलास जाधव हे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या इतिहासात ही महत्वपूर्ण घटना आहे.त्याबद्दल प्रशासनाचे त्यांनी कौतुक केले आहे.विकास कामे करताना पक्षाच्या भूमिका नडत राहतात अशी कबुली दिली आहे.

स्वप्नील निखाडे म्हणाले की,आपण जनहिताची कामे केली आहे.व इतिहासात पहिल्यांदा असा कार्यक्रम पार पडत आहे.त्यावेळी त्यांनी पाच वर्षातील कामाच्या सर्व सभांचा लेखा जोखा मांडला व काही कामे राहून गेल्याचे शल्य बोलून दाखवले आहे.

सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन भाजप गट नेते रवींद्र पाठक,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,सेनेचे गटनेते योगेश बागुल,सत्येन मुंदडा,लेखापाल तुषार नालकर,यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.तर सूत्रसंचलन भावना गवांदे,यांनी केले तर उपस्थितांचे आभार महारुद्र गालट यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close