जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदे अंतर्गत प्रभाग क्रमांक सहा मधील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंचायत समिती ते आठरे बंगल्यापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण या २९लाख ८५ हजार ४९९रुपयांच्या तर याच योजनेतून याच प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे १० लाख रुपये निधीतून सुशोभीकरण करणे,व सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हा स्तर) योजने अंतर्गत प्रभाग क्रं.६ मधील कोपरे घर ते पंचायत समिती पर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अशा एकूण ५६,लाख ०२ हजार ३३६ रुपयांच्या कामाचे भूमिपूजन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते तर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांचा कालावधी संपण्याच्या कालावधीला अठरा तास उलटत नाही तोच हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होत आहे मात्र तो त्यांच्या कालावधीत होऊ शकला नसता का ?असा नेमका सवाल नागरिकांनी व नगराध्यक्ष वहाडणे समर्थकांनी उपस्थित केला आहे.की जाणीवपूर्वक हा उशिरा घेऊन त्यांना डावलले गेले अशी उलटसुलट चर्चा शहरात सुरू झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा परिसर सुशोभीकरण भूमिपूजन प्रसंगी मान्यवर.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत नगरपरिषदेने आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या कालावधीत मोठ्या विकास कामांचा धडाका केला असून त्यातील ५६ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज दुपारी ३.३०वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे नगरपरिषदेचे गटनेते विरेन बोरावके,शहराध्यक्ष सुनील गंगूले,कार्याध्यक्ष अशोक आव्हाटे,नगरसेवक मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार,श्रीमती वर्षा गंगूले,माधवी राजेंद्र वाकचौरे,वर्षा शिंगाडे,सुनील शिलेदार,उद्योजक कैलास ठोळे,लायन्सचे प्रांताध्यक्ष राजेश ठोळे,शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,फकीर कुरेशी,मनोज नरोडे,आदीसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close