गुन्हे विषयक
दारुस पैसे दिले नाही म्हणून चाकूने मारहाण,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादीकडे दारू पिण्यास पैसे मागितले ते दिले नाही म्हणून त्याच गावातील आरोपी नारायण नामदेव वायकर व सुरेश नामदेव वायकर यांनी फिर्यादीच्या भाऊ सागर गव्हाणे यास चाकूने व विटाने मारहाण केली फिर्यादी हे भांडण सोडविण्यास गेले असता आरोपींनी आपल्याला जीवे मारण्याचे उद्देशाने चाकू मारून जखमी केले आहे.अशी फिर्याद शेतमजूर असलेल्या सोमनाथ जालिंदर गव्हाणे (वय-२१) यास जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.या प्रकरणी दोन्ही बाजुंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे.या प्रकरणी गावात भीतीचे वातावरण निर्मांण झाले आहे.
दरम्यान आरोपीं सुरेश नामदेव वायकर यानेही या बाबत पहिल्या गुंह्यातील फिर्यादी सोमनाथ गव्हाणे,त्याचा भाऊ सागर गव्हाणे व अनिल रामदास लांडगे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.व त्यात त्यांनी यातील आरोपी अनिल लांडगे याचेकडे मंजुरीचे पैसे मागण्यास गेलो असता पैसे मागीतल्याचा राग येऊन आरोपीनी आपल्या पाठीवर गजाने मारहाण केली काठीने डोक्यात मारून तसेच चाकूने हातावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी सोमनाथ गव्हाणे व आरोपी नारायण वायकर हे दोन्ही एकाच गावचे रहिवासी असून फिर्यादी हा व त्याचे कुटुंब मोलमजुरीने काम करून आपला उदरनिर्वाह करतात.तर आरोपी त्याच गावातील असून त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे.रविवार दि.२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ सागर जालिंदर गव्हाणे व आरोपी यांची सोनेवाडी शिवारात भेट झाली असता.आरोपीने फिर्यादीचे भावाकडे दारू पिण्यास पैसे मागितले होते.ते देण्यास फिर्यादीच्या भावाने नकार दिला असता त्याचा आरोपी नारायण वायकर व त्याचा भाऊ सुरेश वायकर यांना राग आला.त्यांनी फिर्यादीच्या भावास चाकूने मारहाण करण्यास सुरुवात केली असता.याची बितंबातमी फिर्यादिस मिळाली तो धावतच घटनास्थळी गेला असता आरोपींनी त्यासही जीवे मारण्याचे उद्देशाने चाकू मारून गंभीर जखमी केले आहे.यावरून फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आरोपीं सुरेश नामदेव वायकर यानेही या बाबत पहिल्या गुंह्यातील फिर्यादी सोमनाथ गव्हाणे,त्याचा भाऊ सागर गव्हाणे व अनिल रामदास लांडगे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.व त्यात त्यांनी यातील आरोपी अनिल लांडगे याचेकडे मंजुरीचे पैसे मागण्यास गेलो असता पैसे मागीतल्याचा राग येऊन आरोपीनी आपल्या पाठीवर गजाने मारहाण केली काठीने डोक्यात मारून तसेच चाकूने हातावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४३१/२०२१ भा.द.वि. कलम ३०७,३२६,३२४,३२३,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तापास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करीत आहेत.