जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समता स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव-(प्रतिनिधी)

सामाजिक,शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांमधील नैतिक मुल्यांसह त्यांनी आत्मसात केलेले सुप्त कला-गुण,धीटपणा आदि सादर करण्याचे माध्यम हे वार्षिक स्नेहसंमेलने असतात यांसारख्या वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इंड्स वर्ल्ड स्कूलचे संस्थापक विनायकराव देशमुख यांनी नुकतेच एक कार्यक्रमात बोलताना केले आहे.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकतेच ‘गीता’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.

सदर प्रसंगी समता स्कूलचे उपप्राचार्य श्री विलास भागडे, समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी प्रमुख पाहुणे विक्रमगड मतदार संघाचे आमदार सुनील भुसारा व शाळा व्यवस्थापन समितीचे विश्वस्त अरविंद पटेल,महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख,राजेश परजने, न्यातीज चॅरीटेबल ट्रस्टचे ट्रस्टी राकेश न्याती आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

स्नेहसंमेलनाचे प्रास्तविक शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांनी केले.समता शिर्डी टायनी टॉटसच्या प्राचार्या माही तोलानी यांनी बक्षीस वितरण जाहिर केले.
या स्नेहसंमेलनाचे सुत्र संचलन संस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती विभावरी नगरकर यांनी केले.

उपस्थितांचा सत्कार समता इंटरनॅशनल स्कूलने संस्थापक ओमप्रकाश कोयटे व अरविंदभाई पटेल यांनी केला.

वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी स्कूल व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन, उपप्राचार्य विलास भागडे, उपप्राचार्या शैला झुंजारराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख विभावरी नगरकर (दीदी) व सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
समता इंटरनॅशनल स्कूल व समता टायनी टॉटस यांच्या संयुक्तपणे संपन्न झालेल्या स्नेह संमेलनात समता स्कूल मधील प्राथमिक व माध्यमिक विभाग तसेच समता टायनी टॉटसच्या कोपरगाव, वैजापूर, शिर्डीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.उपस्थितांचे आभार शाळा व्यवस्थापन समितीचे विश्वस्त संदीप कोयटे मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close