जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समताचा सोने तारणाचा दीडशे कोटींचा टप्पा पार-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव सह राज्यात सहकारी पतसंस्थेच्या १५ हजार ५०० ग्राहकांना सेवा देऊन १५० कोटींचा टप्पा पार केला केल्याबद्दल समताचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केक कापून समाधान व्यक्त करून उत्सव साजरा करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज्यात सोनेतारण देणारी हि समता सहकारी पतसंस्था राज्यात पहिलीच असुंन या बाबत राज्यातील सहकारी पतसंस्थाना आपण सोने तारण कर्ज देण्यासाठी मार्गदर्शन करत असून या क्षेत्रातील खाजगी बँका आता सामान्य माणसाला लुटू शकणार नाही.यामुळे सामान्य अडचणीतील ग्राहक आपली गरज भागविण्यासाठी संस्थेत आल्यावर सोने तारणावर कर्ज घेऊन केवळ दहा मिनिटात आपले बाहेर जाऊ शकतो”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता नागरी सहकारी पतसंथा,कोपरगाव.

सदर प्रसंगी समतांचे संचालक अरविंद पटेल,विशाल ठोळे,अनिल जाधव,गुलशन होडे, चांगदेव शिरोडे,जीतूभाई शहा,संदीप कोयटे,शेखर भडकवाडे,महाव्यवस्थापक सचिन भट्टड,अड.गवांदे,सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,स्थावर मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज देणे जोखमीचे ठरले आहे.त्यात कर्जदार बऱ्याच वेळा नाकबूल जातात किंवा त्यातील कायदेशीर त्रुटी दाखवून पळवाटा शोधताना दिसतात.त्या नोंदी करताना अनेक तक्रारी होतात.व पतसंस्था व्यवस्थापनाची उलट तपासणी सुरू होण्याचा अनास्था प्रसंग उभा ठाकत होता.व तपास व चौकशीचा ससेमिरा संस्थेच्या मागे लागत होता.या कटकटी वेळखाऊ व जोखमीच्या ठरत असल्याने व खाजगी परप्रांतीय खाजगी बँका किंवा संस्था या राज्यातील नागरिकांना फसवणूक करताना आढळत होत्या.त्यावर उपाय शोधण्यासाठी समताने सोने तारण व्यवसायात धाडसाने प्रवेश केला आहे.व त्यात मोठे यश मिळाले असून अवघ्या अठरा महिन्यात १५० कोटींचा टप्पा पार केला आहे.यात कर्जवाटपात साठ टक्के तरलता आली आहे.आता पर्यंत संस्थेने एकूण कर्जवाटपात तीस टक्के सोने तारण कर्जवाटप केले आहे.पतसंस्थेच्या आज रोजी ९९ टक्के ठेवी सुरक्षित झाल्या आहे.राज्यात सोनेतारण देणारी हि समता सहकारी पतसंस्था राज्यात पहिलीच असुंन या बाबत राज्यातील सहकारी पतसंस्थाना आपण सोने तारण कर्ज देण्यासाठी मार्गदर्शन करत असून या क्षेत्रातील खाजगी बँका आता सामान्य माणसाला लुटू शकणार नाही.यामुळे सामान्य अडचणीतील ग्राहक आपली गरज भागविण्यासाठी संस्थेत आल्यावर सोने तारणावर कर्ज घेऊन केवळ दहा मिनिटात आपले बाहेर जाऊ शकेल.नुकतीच राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी संस्थेला भेट दिली असून संस्थेच्या कारभाराचे कौतुक केले आहे.सोने तारणातून संस्थेने दहा कोटी पन्नास लाख रुपयांना सुरक्षितता प्रदान केली आहे. संस्थेने आज एका दिवसात एक कोटी अडतीस लाखांच्या ठेवी मिळवल्या आहेत.या सोनेतारणामुळे खाजगी सावरकारशाही मोडीत निघण्यास व परप्रांतीय आर्थिक संस्थांची मक्तेदारी मोडीत निघणार असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.व आज समता पतसंस्थेसाठी आज महत्वाचा टप्पा व आनंदाचा क्षण आहे.त्या आनंदात संस्थेचे संचालक,ठेवीदार,कर्जदार व हितचिंतक व माध्यमांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक संदीप कोयटे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन जेष्ठ संचालक अरविंद पटेल यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close