जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कर्मवीर काखान्याचे कार्यकारी संचालक जगताप यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यातील सहकारात क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगन्नाथराव जगताप यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.जगताप हे सन-२००१ पासून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समूहाच्या प्रगतीसाठी तीन पिढ्यांसाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

स्व.जगताप हे मूळ पारनेर तालुक्यातील रहिवासी होते.ते १९८० साली सहाय्यक लेखापाल म्हणून सेवेत रुजू झाले होते.त्या नंतर ते लेखापाल,मुख्य लेखापाल,महाव्यवस्थापक,व नंतर २००१ साली कार्यकारी संचालक या पदावर बढती झाली होती.ते अखेरपर्यंत सेवेत होते.त्यांना आज सकाळी अकरा वाजता हृदय विकाराचा झटका आला होता.उपचारार्थ त्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.ते माजी खा.शंकरराव काळे,माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे या तीन पिढ्यांशी एकनिष्ठतेने काम केले होते.त्यांच्या निधनाने कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

त्यांच्या निधनाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आ.अशोक काळे तसेच श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दु:ख व्यक्त केले असून कारखाना व उद्योग समूहाचे त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांच्या पच्छात पत्नी जयमाला,दोन मुले,असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close