जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव न.प.निवडणुकीत बहुमताने निवडून दिले तर विकास कामांना गती देईल-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी काळातील नगरपरिषद निवडणुकात आपण बहुमतांनी नगरसेवक निवडून दिले तर काम करणे सोपे जाईल बाकी कामे कशी मार्गी लागतील ती जबाबदारी शतप्रतिशत आपणावर सोडावी असे आवाहन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

आपल्या कार्यकाळात बरेच अडथळे आले तरी सर्वाधिक विकास कामे झाली असल्याचा दावा करून बाजार तळावर खोका शॉप करावे असे आवाहन करून काही लोक विस्थापितांचा प्रश्न घेऊन आले तर अशा थापड्यांच्या कानाखाली आवाज काढा”-विजय वाहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ९९ लाख ८६ हजार ९२१ रुपये खर्चाच्या अमर धाम विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मेहमूद सय्यद,प्रतिभा शिलेदार,महात्मा गांधी ट्रस्टचे विश्वस्त धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक,मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,दीपा गिरमे,प्रतिभा शिलेदार,वर्षा शिंगाडे,श्रीमती वर्षा गंगुले,माधवी वाकचौरे,अजीज शेख,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,राष्ट्रवादी शहर युवा अध्यक्ष नवाज कुरेशी,फकीर कुरेशी,महेश उदावंत,माजी नगरसेवक रमेश गवळी,आदी मान्यवर उपस्थित होते.सदरचे काम ठेकेदार बाबासाहेब शिंदे यांनी निविदेद्वारे घेतले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”गत निवडणुकीत आपण विकास कामांना सर्वाधिक आधी विकास कामांना नगराध्यक्ष वहाडणे यांना पाठिंबा दिला होता.मात्र सत्ताधाऱ्यांनी मात्र विकास कामांना खोडा घालण्याचे काम केले आहे.खोडा घालण्याचे कारण असमर्थनीय होते.नंतर विरोध मागे घेतला होता.पण त्या वेळी,” बैल गेला आणि झोपा केला” अशी पालिकेची अवस्था करून ठेवली आहे.आपल्या विरोधात नगराध्यक्ष वहाडणे हेही उभे होते तरी आपण विरोध विसरून विकासकामांना पाठिंबा दिला होता याची आठवण करून दिली आहे.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोपरगाव नगरपरिषदेच्या अमर धाम योजनेच्या कामात २६ टक्के कमी दराने निविदा भरली आहे त्यामुळे आपण जादा काम करू शकतो.त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने विचार करावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”आपल्या कार्यकाळात बरेच अडथळे आले तरी सर्वाधिक विकास कामे झाली असल्याचा दावा करून बाजार तळावर खोका शॉप करावे असे आवाहन करून काही लोक विस्थापितांचा प्रश्न घेऊन आले तर अशा थापड्यांच्या कानाखाली आवाज काढा असे कोल्हे गटाचे नाव न घेता जाहीर आवाहन केले आहे.व त्यांच्याच नगरसेवकांनी मुख्य जलवाहिणीवर चोवीस तास नळ जोडण्या घेऊन आपले शहराप्रती उत्तर दायित्व (?) दाखवून दिले आहे,आपण अवैध ७० नळ जोडण्या तोडून टाकल्याचा दावा केला आहे.व अवैध नळ जोडण्या घेणारच आज ४२ कोटीच्या पाणी योजनेवर टीका करत आहे.त्यावेळी गप्प बसण्याची भूमिका घेतली व आज बोंबा मारत असून संबंधित ठेकेदार जर न्यायालयात खटला जिंकला तर नगरपरिषदेवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडणार आहे.त्याचा चटका सामान्य नागरिकांच्या खिशावर पडणार आहे.काहींना आपण आपल्या कार्यकाळात हरामखोर शब्द प्रयोग करत नसल्याची कोपरखीळी मारली त्यांना सांगू इच्छितो की येत्या २९डिसेंबर नंतर आपण त्या प्रवृत्तीचा बेत पाहताना त्याचा शुभारंभ करू असे सूतोवाच केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मनोज नरोडे या प्रभागातील नगरसेवकांवर २८ रस्ते विकास कामांना न्यायालयात खेचल्या बद्दल तिखट शब्दात टिका केली यांनी केले तर उपस्थितांना

यांनी मार्गदर्शन केले.तर सूत्रसंचलन अशोक आव्हाटे यांनी केले तर उपस्थितांना नगराध्यक्ष विजय वहाडणे,धनंजय कहार,माजी नगरसेवक रमेश गवळी आदींनी मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे सोमेश शिंदे आभार यांनी मानले आहे.

सदर प्रसंगी आ.काळे यांनी कोपरगाव शहराला १२० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केल्याबद्दल प्रभागातील महिलांनी शाल,हार,श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close