जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात नगरपरिषद कार्यक्रमात “कोल्हेंच्या स्वागताला काळेंचे फटाके !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारत लोकार्पण सोहळ्याचे औचित्याने व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील आजी व माजी आमदार काळे-कोल्हे यांनी कार्यकर्ते विरहित एकत्र बैठक घेऊन कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न एक दिलाने मिटवावा व शहरातील नागरिकांची दुर्दशा दूर करावी असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान आ.आशुओष काळे यांनी गौतम बँकेच्या खाली प्रांगणात भारत-पाकिस्तान यांच्या १९७१ च्या युद्धात सहभागी असललेल्या वीर माजी सैनिकांचा सत्कार आयोजित केला होता.तो कार्यक्रम अंतिम टप्यात असतानाच माजी.आ.कोल्हे यांचे नगरपरिषदेच्या कार्यक्रमस्थळी आगमन झाले.त्या वेळी आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमस्थळी जंगी तयारी करून काही तोफांसह फटाके आणून ठेवले होते.त्या आ.आशुतोष काळेंच्या फटाक्यावरच कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताव मारल्याचे उघड झाले आहे.

कोपरगाव नगरपरिषद येथील वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत ०२ कोटी ३२ लाख ४३ हजार रुपयांच्या प्रशासकीय नूतन ईमारतीच्या दोन मजल्यांचा लोकार्पण सोहळा आगामी नागरपरिषद निवडणूक पूर्व आ.आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी,आरोग्य सभापती शिवाजी खांडेकर,बांधकाम समिती सभापती संजय पवार,पाणी पुरवठा सभापती सुवर्णा सोनवणे,शिक्षण सभापती योगेश बागुल,महिला बालकल्याण सभापती हर्षा कांबळे,भाजप गटनेते रवींद्र पाठक,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक विजय वाजे,अनिल आव्हाड,सप्नील निखाडे,मंदार पहाडे,दीपा गिरमे,विद्या सोनवणे,मेहमूद सय्यद,प्रतिभा शिलेदार,वर्षा शिंगाडे,सत्येन मुंदडा,माधवी वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान सदर कार्यक्रमात इमारत कोनशिला लावताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या पाच वर्षातील सवयीप्रमाणे कोविड काळात विशेष योगदान देणाऱ्या आरोग्य कर्मचारी राजेंद्र मेवाते यांचे व रुग्णवाहिकेद्वारे आपली आरोग्य चोख सेवा बजावणाऱ्या अमित खोकले या दोन कर्मचाऱ्यांची दखल घेतली असून त्यांचे नाव यात कोरले आहे हे विशेष !

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहर वर्तमानात पाण्याची गरज भागवत असले तरी भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते हे गृहीत धरून खऱ्या अर्थाने प्रयत्न करण्याची गरज आहे.मात्र या पातळीवर बऱ्याच वेळा शुकशुकाट दिसतो तो या निमित्ताने दूर होईल असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

दरम्यान आ.आशुओष काळे यांनी गौतम बँकेच्या खाली प्रांगणात भारत-पाकिस्तान यांच्या १९७१ च्या युद्धात सहभागी असललेल्या वीर माजी सैनिकांचा सत्कार आयोजित केला होता.तो कार्यक्रम अंतिम टप्यात असतानाच माजी.आ.कोल्हे यांचे नगरपरिषदेच्या कार्यक्रमस्थळी आगमन झाले.त्या वेळी आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमस्थळी जंगी तयारी करून काही तोफांसह फटाके आणून ठेवले होते.त्या आ.आशुतोष काळेंच्या फटाक्यावरच कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताव मारला व त्याला स्वागतासाठी बत्ती दिल्याने इकडे काळे गटात खळबळ उडाली व यांचा समज झाला की,कोल्हे गटाने (सवयीप्रमाणे) उदघाटन उरकून घेतले आहे.त्या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.मात्र घटनास्थळी गेल्यावर समजले की,काळेंच्या फटाक्यांवर कोल्हेचे स्वागत झाले आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना हि बाब काळे गटाच्या एका जेष्ठ सदस्याने हि उघड केली व त्यासाठी ज्याच्या ताब्यातील फटाके पळवले त्या युवा कार्यकर्त्याची भेट घालून दिली आहे.त्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.त्यामुळे या महत्वाच्या कार्यक्रमात,”उदघाटना ऐवजी कोल्हेच्या स्वागताला काळेंचे फटाके” याचीच जोराची चर्चा सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close