जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन अपघातात दोन जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० दोन वेगवेगळ्या अपघातात एक महिला व एक पुरुष गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे.त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग १६० वर साई भक्तांसह अन्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोहेगाव येथील रहिवासी इसम ज्ञानेश्वर पुंडलिक झावरे (वय-६२ वर्षे) हे आपले काम आटोपून संध्याकाळी आपल्या घरी होंडा एक्टिवा दुचाकी क्रं.एम.एच.१७ ए.यू.५६०० वर घरी परतत असताना झगडे फाटा येथे संध्याकाळी ७.४५ वाजता शिर्डी कडून नाशिक कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चारचाकी गाडीने त्यांच्या एक्टिवा गाडीला जोराची धडक दिल्यामुळे ते गंभीर रित्या जखमी झाले आहे.

शिर्डीस येणाऱ्या साईभक्तांचे अपघात कमी करण्यासाठी शिर्डी मार्गे अ.नगर-सिन्नर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० हा सन-२०१३-१४ साली तत्कालीन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचोरे यांनीही केंद्र सरकारकडून मंजुर करून घेतला होता.व राज्य मार्ग झगडे फाटा ते संगमनेर व झगडे फाटा ते पुणतांबा फाटा राष्ट्रीय महामार्ग असे तीन रस्ते झगडे फाटा या ठिकाणी एकत्र येतात.राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६० चे संपूर्ण काम अजून झालेले नाही परंतु झगडे फाटा परिसरात रस्त्याचे बऱ्यापैकी काम झालेले असल्यामुळे चार चाकी वाहने अति वेगाने ये-जा करत असतात.त्यामुळे या परिसरामध्ये आता पर्यंत अनेक अपघात घडलेली आहेत.अशीच घटना दि.०८ जुलै रोजी घडली आहे.ज्ञानेश्वर पुंडलिक झावरे (वय-६२ वर्षे) रा.पोहेगाव हे कोपरगाव येथील आपले काम आटोपून संध्याकाळी पोहेगावकडे आपल्या घरी होंडा एक्टिवा दुचाकी क्रं.एम.एच.१७ ए.यू.५६०० वर घरी परतत असताना झगडे फाटा येथे संध्याकाळी ७.४५ वाजता शिर्डी कडून नाशिक कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चारचाकी गाडीने त्यांच्या एक्टिवा गाडीला जोराची धडक दिल्यामुळे ते गंभीर रित्या जखमी झाले आहे.परंतु ट्रॅव्हल्स वाला धडक देऊन फरार झाला होता.तो निघून गेल्यामुळे तेथील नागरिकांनी झावरे यांना त्यांच्या घरी पोहेगाव येथे रवाना केले नंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती त्यांची कन्या गीतांजली झांबरे यांनी दिली आहे.

दुसरी घटना दि.०९ जुलै रोजी झगडे फाटा येथे दुपारी २.३० च्या दरम्यान घडली आहे.गवारे नामक इसम आपले बजाज प्लॅटीना मोटरसायकल क्रं.एम.एच.१७ सी.जी.०२५१ वर एक महिला घेऊन कोपरगाव कडून पोहेगावच्या दिशेने जाताना नाशिककडून शिर्डी कडे जाणाऱ्या इनोव्हा कार क्रं.डी.एन.०९ जी.२६१० या गाडीने धडक दिल्यामुळे मोटरसायकल वरील महिला गंभीर रित्या जखमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे.तेथील नागरिकांनी त्या दोघांनाही पुढील उपचारासाठी कोपरगावला रवाना केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.मात्र त्यास कोपरगाव तालुका पोलिसांनी दुजोरा दिला नाही.

झगडे फाटा या ठिकाणी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना होणे गरजेचे असल्याची चर्चा येथील नागरिकांमधून होत आहे.तसेच कोपरगाव संगमनेर मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे ते काम लवकर पूर्ण झाले तर अपघाताला बऱ्याच प्रमाणात आळा बसू शकेल व त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.यंत्रणा बसवावी जेणेकरून अपघात करून जाणाऱ्या वाहनांची माहिती त्यातून पोलिसांना मिळून जखमींना न्याय देण्यासाठी याचा फायदा होऊ शकेल अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close