जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

या गावात अपंगांना निधीचे वाटप उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन धामोरी ग्रामपंचायतीने स्व-उत्पनाच्या ५ टक्के निधीचे लोकनियुक्त सरपंच जयश्री भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच शिवाजी वाघ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आले आहे.
दिव्यांगांचे जिवनमान उंचवण्यासाठी व त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासन दरबारी संजय गांधी निराधार योजना, प्रवास भाडयात ७५ टक्के सवलत , दिव्यांग घरकुल योजना, सरकारी नोकरीमध्ये ४ टक्के आरक्षण, घरपट्टीमध्ये ५o टक्के सवलत अशा अनेक कल्याणकारी . योजना राबविल्या जातात .त्याचाच एक भाग म्हणुन ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका हे आपल्या स्व – उत्पनातील ५ टक्के निधी दिवांगांच्या कल्याणासाठी वापरतात. त्यास अनुसरून धामोरी ग्रामपंचायतने जब्बरभाई शेख, प्रसाद कदम, दादासाहेब मांजरे, .रामदास गायकवाड, निसार शेख, शमीना शेख, अमिन शेख, रहिम शेख, बाबासाहेब लव्हाटे, दत्तु तांबडे, अझर शेख, इस्माईल शेख, वैष्णवी कांबळे, दत्तु वाघ, साहिल वाणी, सरिता गायकवाड, कल्पना भाकरे, रुक्साना शेख नाजिम शेख अशा एकूण ३० दिव्यांग लाभार्थीना प्रत्येकी १४०३ रुपये अशा रोख रकमेची वाटप केली आहे.
सदर कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी सोनवणे, माजी सदस्य सुभाष अहिरे , बाबासाहेब गांगुर्डे , तळेकर, कोळपे, मोहन डोंगरे, वजिर शेख, प्रकाश मोकळ, नवनाथ पगारे, विजय शरमाळे, संजय वाघ असे अनेक ग्रामस्थ , महिला व दिव्यांग बांधव मोठया संस्थेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विलास डोंगरे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close