कोपरगाव तालुका
…या स्कूलच्या इंटरहाउस स्पर्धेत रेड हाउसची कॉक हाउस म्हणून निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलीत गौतम पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इंटरहाउसचे स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असुन यामध्ये मुलांच्या रेड हाउस व मुलींच्या रोझ व लिली हाउस यांनी सयुक्तरित्या अव्वल राहत कॉक हाउसचा खिताब पटकावला. मानाचा समजला जाणारा हा खिताब संस्थेचे विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०१८ -१९ इंटर हाउसेस स्पर्धा घेण्यात येतात.यामध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हाँलीबॉल, बास्केटबॉल आदी मैदानी खेळांच्या स्पर्धेंबरोबर वक्तृत्व, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यासाठी बाहेरून तज्ञ प्रशिक्षक नियुक्त करून पारदर्शक पद्धतीने मुल्यांकन केले जाते. सदर स्पर्धेव्दारे मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. इंटर हाउसेस स्पर्धांव्दारे मागील दोन वर्षात शाळेला उत्कृष्ट खेळाडू, वक्ते व कलाकार मिळाले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
या इंटरहाउसेस स्पर्धेअंतर्गत झालेले काही सामने टायरहित स्पर्धा अतिशय चुरशीच्या झाल्या. यामध्ये मुलांच्या रेड हाउसने बाजी मारली. यात आपल्या नेतृत्व शैलीची चुनूक दाखवत सुभाष वाणी यांनी रेड हाउसचे नेतृत्व केले. त्यांना शहाजी ढोणे, सबिया शेख, सोपान गांगुर्डे, स्वाती वाणी यांचे सहकार्य लाभले. तर मुलींच्या विजेत्या रोझ हाउसचे नेतृत्व रेखा जाधव यांनी केले त्यांना सुनिता शिदे, प्रतिभा बोरनर, वैशाली उंडे, निकीता आदीक आदींचे सहकार्य मिळाले तसेच मुलींच्या लिली हाउसचे नेतृत्व कविता चव्हाण यांनी केले त्यांना भारती उंडे, राणी वारूळे, निकिता निळकंठ आदींचे सहकार्य लाभले. सर्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ज्योती शेलार, सुनिता कुलकर्णी, क्रीडा संचालक सुधाकर निलक, शिस्त विभाग प्रमुख रमेश पटारे, कपील वाघ आदींनी काम पाहिले.