जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगांव शहर राज्यात ‘ब’ वर्ग नगरपरिषदेत दुसरे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामधील सर्व शहरामधील उघड्यावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबाना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी व शहरामधील घनकचऱ्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) हे एक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे.यात नागरिकांचा सहभागाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मूल्यांकन करण्यात आले असून कोपरगाव शहर त्यात कोपरगाव शहर राज्यात ‘ब’वर्ग नगरपरिषदेच्या स्पर्धेत दुसरे आल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० संपुर्ण देशभर स्वच्छतेच्या विविध पैलुवर सर्व शहराचे मुल्यांकन दिनांक ४ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मुल्यांकन सुरु असून या स्वच्छ सर्वेक्षना मध्ये आपले कोपरगाव शहर सहभागी असून आपल्या शहराचे गुणांक वाढविण्यासाठी देशातील सर्व शहरामधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामधील सर्व शहरामधील उघड्यावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबाना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी व शहरामधील घनकचऱ्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) हे एक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी शहरस्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत करण्यात येत आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०२० संपुर्ण देशभर स्वच्छताच्या विविधपैलुवर सर्व शहराचे मुल्यांकन दिनांक ४ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मुल्यांकन सुरु आहे.स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपले कोपरगाव शहर सहभागी असून आपल्या शहराचे गुणांक वाढविण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,अधिकारी,सर्व विभाग प्रमुख, सर्वच कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, उपाध्यक्ष व अध्यक्ष प्रयत्न करत आहेत. सर्व नागरिकांचेही या प्रयत्नांना सक्रिय सहकार्य आहे. नागरिकांच्या सहभाग शिवाय स्वच्छ सर्वेक्षण शक्य नसून. अद्याप पर्यंत शहरातील १७८९४ नागरिकांनी नागरिक प्रतिसाद दिला आहे. तरी अजून पर्यंत ज्या नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला नाही त्यांनी त्वरित आपले नोंदवून कोपरगाव शहराला सर्वोच्च गुणांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आरोग्य सभापती अनिल आव्हाड, उपाध्यक्ष योगेश बागुल, यांनी केले आहे.
शहरातील जास्तीजास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदणी करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करणे कामी उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे व स्वच्छ सर्वेक्षण नोडल अधिकारी महारुद्र गालट यांचे नेतृत्वाखाली सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहे. तरी नागरिकांनी स्वत: स्वच्छ सर्वेक्षण सहभाग नोंदवावा. किंवा आपले मत नोंदवण्यासाठी येणा-या कर्मचारी यांना सहकार्य करावे. त्यातून कोपरगाव शहर या चळवळीत अग्रणी जाण्यास मदत होणार आहे.असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शेवटी केले आहे.कोपरगाव नगरपरिषदेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close