जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अल्पवयीन मुलीवर बलात्कार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली अल्पवयीन मुलीवर कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर येथील आरोपी अविनाश नारायण पंडोरे (वय-२८) याने फिर्यादी मुलीच्या राहत्या घरी २२ नोव्हेंबर पासून १५ जानेवारी पर्यंत चार वेळेस बलात्कार केला असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने टाकळी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

यात फिर्यादी मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वरील अविनाश पंडोरे या आरोपीने आपल्याला गोड-गोड बोलून तीस व तिच्या आजीला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार तिच्या घरी येऊन तिचे मनाचे विरुद्ध लैंगिक अत्याचार केला आहे.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सोमवार दि.२७ जानेवारी रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गु.र.नं.३७ /२०२० भा.द.वि कलम ३७६,लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४ अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम ३ (१)(२)(१५) सुधारणा अधिनियम २०१५ कलम ३(१) डब्ल्यू ( १)(२)३(१)(झेड) प्रमाणे या अल्पवयीन मुलीने आरोपी अविनाश नारायण पंडोरे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे ,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close