जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आत्मा मालिकमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे धडे – डॉ. किशोर गोडगे.

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये ध्यानाच्या माध्यमातून स्वतः मधील परमेश्वराला ओळखा. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर नांदतो त्यामुळे आपला एकमेकांशी तसा व्यवहार असला पाहिजे हि शिकवण दिली जात आहेच पण त्याचबरोबर आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या माध्यमातून सुमारे आठशे विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय भावना जागृत करून राष्ट्र सुरक्षेचे धडे दिले जात असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील श्री. साईनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे न्युरोसर्जन डॉ. किशोर गोडगे यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सैनिकी स्कूलच्या आठशे विद्यार्थ्यांनी लक्षवेधी परेड संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. एनडीए अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे क्रीडा प्रकार सादर केले तर शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी योगासने सादर करून लक्ष वेधून घेतले. तसेच देशभक्तिपर समुहगीत व भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल येथे ७१ व्या प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी आत्मा मालिक माऊली,परमानंद महाराज,निजानंद महाराज, संत मांदियाळी प्रमुख पाहूणे मोहन बागडे वस्तू व सेवाकर उपायुक्त, क्रोल वालडेक पोलंड, डेफ्रिज सायमन व डेफ्रिज अँण्ड्रीया युके, सेलिना टेक्स जर्मनी, बालैय्या दोरणाडुल्ला आंध्रप्रदेश, डॉ. सुहास घुले व डॉ. स्वाती घुले अहमदनगर, चित्रपट निर्मात्या व आश्रमाच्या विश्वस्त अश्विनी दरेकर, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, प्रभाकर जमधडे, परदेशी भाविक, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सर्व प्राचार्य, पालक व सुमारे साडे आठ हजार विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सैनिकी स्कूलच्या आठशे विद्यार्थ्यांनी लक्षवेधी परेड संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. एनडीए अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे क्रीडा प्रकार सादर केले तर शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी योगासने सादर करून लक्ष वेधून घेतले. तसेच देशभक्तिपर समुहगीत व भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली.
या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून परदेशातील नागरिकांना सन्मान देण्यात आला. तसेच परदेशी महिलांनी पंधरा दिवस सराव करून सामुहिकपणे राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close