कोपरगाव तालुका
खिर्डी गणेश शिवारात अपघात,एक ठार,एक जखमी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या खिर्डी गणेश शिवारात असलेल्या खिर्डी गणेश फाट्याजवळ बजाज डिस्कव्हर क्रं.एम.एच.१७ ए. टी.७५५७) या दुचाकीस शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मागील बाजूने येणाऱ्या गुजरात राज्यातील ट्रक (क्रं.जी.जे.१८ झेड ४१११) या वरील बसचालकाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात करंजी येथील इसम सचिन ज्ञानदेव भिंगारे (वय-३४)रा.करंजी हे जागीच ठार झाले असून त्यांच्या सोबत असलेले सहकारी प्रकाश पुंजा वाणी हे गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणी फिर्यादी बाळासाहेब नामदेव भिंगारे (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बस वरील चालक याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहराच्या उत्तरेस खिर्डी गणेश ग्रामपंचायत असून त्या गावालगत नगर-मनमाड हा राज्य मार्ग असून या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड गर्दी असते.त्यात अवजड वाहतुकीचा जास्त भरणा असतो.वरील तारखेस व यावेळी वरील इसम आपल्या घरी जात असताना त्यांना खिर्डी गणेश फाट्यावर मागील बाजूने वरील क्रंमांकाच्या बसने जोराची धडक दिल्याने त्यात सचिन भिंगारे हे गंभीर जखमी होऊन ठार झाले आहे.अपघातानंतर वाहनचालक कोणतीही खबर न देता फरार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या बस चालकाविरुद्ध फिर्यादी बाळासाहेब भिंगारे यांनी गुन्हा दाखल केला आहे.तालुका पोलिसानी अज्ञात बस चालकाविरुद्ध गु.र.न.२५/२०२० भा.द.वि.कलम ३०४ (अ).२७९,३३७,४२७ मो.वा.का.कलम १८४,१३४,(अ),(ब),१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.