कोपरगाव तालुका
कोपरगावात लक्ष्मीनगर भागातील रस्त्याच्या पुन्हा तक्रारी,
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे पश्चिमेस असलेल्या धारणगाव रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मीनगर या उपनगरात नगपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या निकृष्ठ रस्त्याच्या विरुद्ध आज या भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून या रस्त्याच्या रकमेची वसुली संबंधित ठेकेदाराकडून करण्यात यावी अशी मागणी तुषार पोटे, सचिन लासुरे,आकाश कानडे, साजिद पठाण आदींसह वीस नागरिकांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली असून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या रस्त्यावर सिमेंट कमी प्रतीचे वापरले असल्याने त्यावर डांबरही त्याला धरण्यास तयार नाही.परिणामस्वरूप आता त्यावर गाय-बैल या यासारखे मुकी जनावरे त्यावर ठाण मांडून बसली तर ते डांबर थेट या जनावरांनाच चिकटून पोपडा धरत असल्याने मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे नागरिकांची नाराजी निर्माण झाली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत लक्ष्मीनगर या भागात नुकताच सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.मात्र अल्पावधीतच या ठेकेदाराने निकृष्ठ काम केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत.नुसत्या तक्रारीचा नाही तर त्या कामावर ठेकेदाराने सिमेंट वापरले कि राख याचाच बोध नागरिकांना होईनासा झाला आहे.येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या धुळीने या भागात राहाणे मुश्किल बनवले आहे.या बाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही त्या नंतर दाखल घेऊन बांधकाम विभागाने त्यावर डांबर मारण्याचा अगोचर प्रकार केल्याने आता नवाचं प्रश्न निर्माण झाला आहे.हे सिमेंट कमी प्रतीचे असल्याने त्यावर डांबरही त्याला धरण्यास तयार नाही.परिणामस्वरूप आता त्यावर गाय-बैल या यासारखे मुकी जनावरे त्यावर ठाण मांडून बसली तर ते डांबर थेट या जनावरांनाच चिकटून पोपडा धरत असल्याने मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या आधीच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली आहे यात हा ठेकेदार आहे किंवा कसे ? याचा खुलासा बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे.नागरिकांच्या पैशाचा हा अपव्यय असून यावर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे हि काळाची गरज बनली आहे.या बाबत नागरिकांनी या रास्त्याचे काम पुन्हा करण्यात यावे अशी मागणी करून या बाबत कारवाई झाली नाही तर आपण तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही खाली सह्या करणाऱ्या नागरिकांनी दिला आहे.निवेदनावर प्रवीण पाटील,शेखर बोरावके, विशाल कुमावत, शेरखान पठाण, शुभम वढणे, नरेश जोशी, अक्षय जाधव विराट नरोडे,गोरख तेलोरे आदींच्या सह्या आहेत.