जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

धारणगाव शिवारात कार अपघात,मोहाडीतील तीन ठार,एक जखमी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत सोनार वस्ती फाट्यानजीक रात्री साडे दहाच्या सुमारास मोहाडी ता.दिंडोरी जिल्हा नाशिक येथील होंडा कार (क्रं.एम.एच.१५ बी.एक्स.५१४५) कोळपेवाडी कडून कोपरगावकडे भरधाव वेगात येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार लिंबाच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात कारचा चक्काचुर होऊन त्यात कार चालक रवींद्र अशोक वानले (वय-३५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी अनुप्रीत रवींद्र वानले (वय-३०), मुलगा साई वानले,मुलगी जानू वानले (वय-४) हे तिघे उपचारा दरम्यान ठार झाले असून हा अपघात इतका जोराचा होता कि कार यात चक्काचूर होऊन झालेल्या अपघातानंतर तिने पेट घेतला व कारचा दोन त्रित्यांश हिस्सा जळून खाक झाला आहे.

कळवण तालुक्यातील रवींद्र वानले हे आपली कार घेऊन काही कारणाने मोहाडी वरून विंचूरला बहिणीला भेटून कोळपेवाडी मार्गे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कोपरगावकडे भरधाव वेगाने येत असताना त्यांच्या कारवरील त्यांचे नियंत्रण एका क्षणी सुटले व कार तितक्याच वेगाने रस्त्याच्या कडेच्या झाडावर आदळली त्यातून या कारने पेट घेतला व त्यात त्यांची पत्नी अनुप्रित रवींद्र वानले या व त्यांची मुले अनुक्रमे साई वानले,जानु वानले हे ठार झाले आहे.विंचूरवरून ते कोठे चालले होते हे मात्र कोणालाही ठाऊक नसल्याची माहिती हाती आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,रवींद्र वानले यांनी नुकतीच वरील क्रमांकाची होंडा सिटी हि कार नोटरी करून विकत घेतली होती.ती अद्याप नावावर करण्याचे काम बाकी असताना ते आपली कार घेऊन काही कारणाने मोहाडीवरून कोळपेवाडी मार्गे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कोपरगावकडे भरधाव वेगाने येत असताना त्यांच्या कारवरील त्यांचे नियंत्रण एका क्षणी सुटले व कार तितक्याच वेगाने रस्त्याच्या कडेच्या झाडावर आदळली त्यातून या कारने पेट घेतला व त्यात त्यांची पत्नी अनुप्रीत रवींद्र वनाले या व त्यांची मुले अनुक्रमे साई वानले,जानु वानले हे ठार झाले आहे.घटना घडल्यानंतर नजीकच्या ग्रामस्थांनी कोपरगाव तालुका पोलिसाना व कोपरगाव तालुका पोलिसानी या बाबत नाशिक जिल्हा पोलिसांना या बाबतची खबर केली असून उपचारार्थ मुलांना आत्मा मलिक हॉस्पिटलला भरती केले असताना मुलांची प्राणज्योत मालवली तर कार चालकांची पत्नी या कोपरगावातील फडके हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांचे काही नातेवाईक आज दुपारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनाही ते कोठे जात होते याची माहिती नसल्याचे उघड झाले आहे.मात्र चालक हे काहीतरी तणावात असावे असा कयास व्यक्त होत आहे.मात्र ते मद्यधुंद मात्र नव्हते असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.या बाबत धारणगाव येथील पोलीस पाटील यांचे पती निळू तात्याबा रणशूर यांनी या बाबत चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close