कोपरगाव तालुका
कोपरगावात लिंबोळी खताची चोरी,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या भाडोत्री गोडावूनच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अंबिकानगर येथील आरोपी किरण बोथरा याने मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीचा (क्रं.एम.एच.१७ बी.सी.६३२३ ) व रिक्षाचा वापर ( क्रमांक माहित नाही) करून कोरोमंडलम कंपनीच्या लिंबोळी खतांच्या पंचवीस किलो वजनाच्या,पाचशे रुपये किमतीच्या पन्नास गोण्या पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध फिर्यादी राजेंद्र गणपत रुपनर (वय-६० ) यांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत सहकारी औद्योगिक वसाहत असून या ठिकाणी राजेंद्र रुपनर यांचे भाडोत्री पद्धतीने घेतलेले लिंबोळी पेंडीचे गोडावून आहे.ते नेहमी प्रमाणे १२ जानेवारी सायंकाळी आपले गोदाम व तेथील कार्यालय बंद करून गेले असता.दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे त्यांना आपल्या कार्यालयाचे कुलूप तोडलेले आढळले.आरोपी किरण बोद्या याने कुलूप तोडून आतील भागात ठेवलेले लिंबोळी खतांच्या सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीच्या व प्रत्येकी पंचवीस किलो वजनाच्या पन्नास गोण्या आपल्या रिक्षात भरून नेल्या आहेत.या बाबत घटनास्थळी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१७/२०२० भा.द.वि.कलम ४५४,३८० प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे पुढील तपास करीत आहेत.