जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संविधान हा भारतीय सार्वभौम तत्वाचा मुळ पाया-तहसीलदार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

संविधान हा भारतीय सार्वभौम तत्वाचा मुळ पाया आहे व त्यामुळे प्रत्येक नागरीकांना हक्क व कर्तव्याची जाणीव झाली असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे तहसिलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २६नोव्हेंबर ‘राष्ट्रीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड,जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्ही,कामगार तलाठी संदीप चाकणे,तांगडे,आर.आर.लकारे,एस.एन.शिरसाळे,ए.बी.अमृतकर आदि मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रारंभी कोपरगांवचे तहसिलदार बोरुडे यांचे हस्ते संविधान प्रतिमेचे पुजन करण्यात आले.सदर प्रसंगी तहसिलदार बोरुडे यांचे हस्ते माझी वसुंधरा आभियाना अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर उपस्थितांना कैलास ठोळे,दिलीपकुमार अजमेरे यांनी मार्गदर्शनक केले तर इयत्ता १० वी तील विद्यार्थी कु.तनया संत,व प्रथमेश कुलकर्णी यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर उपस्थितांचे आभार ए.जे.कोताडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close