जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव बस स्थानकाच्या चौफेर व्यापारी संकुल उभारा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव बस स्थानकाचे नुतनीकरणाचे काम वर्तमानात अंतिम टप्यात आले आहे.मात्र याच बस स्थानकाशेजारी यापूर्वी अनेक लहान मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केल्याने हे व्यावसायिक परागंदा झाले असून परंतु नूतन बस स्थानकाच्या नियोजित इमारतीमध्ये व्यावसायिकांसाठी नवीन गाळ्यांचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी राज्याच्या नगरविकास मंत्री यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

“कोपरगाव बस स्थानकाशेजारी यापूर्वी अनेक लहान मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केल्याने हे व्यावसायिक पराधीन झाले.परंतु नूतन बस स्थानकाच्या नियोजित इमारतीमध्ये व्यावसायिकांसाठी गाळ्यांचे नियोजन करण्यात आलेले नाही.कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.तो सुटण्यास मदत मिळणार आहे”-विजय वाहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाशेजारीच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिर्डी देवस्थानसह अनेक धार्मिक स्थळे असल्यामुळे कोपरगाव बसस्थानकावर इतर जिल्हा व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी येत-जात असतात. हे बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दिवसभरात येथे हजारो प्रवाशांची व शेकडो बसची वर्दळ असते.मात्र या प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा मिळत नाही.कोपरगाव बस स्थानकाचे नुतनीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे.या बस स्थानकाशेजारी यापूर्वी अनेक लहान मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केल्याने हे व्यावसायिक पराधीन झाले.परंतु नूतन बस स्थानकाच्या नियोजित इमारतीमध्ये व्यावसायिकांसाठी गाळ्यांचे नियोजन करण्यात आलेले नाही.कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.या व्यावसायिकांवर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे.कोपरगाव शहराची वाढत असलेली लोकसंख्या व बाजारपेठेचा प्रश्न सुटावा यासाठी नूतन बस स्थानकात सर्व बाजूंनी डबल मजली व्यापारी संकुल होणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आदी ठिकाणी झालेल्या बस स्थानकाच्या सर्व बाजूंनी मोठे व्यापारी संकुल बांधण्यात आलेले आहे.या प्रमाणेच कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारावे त्यामुळे कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्यासाठी कोपरगाव बस आगाराच्या मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी मान्यता द्यावी अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी परिवहन व नगरविकास मंत्री यांच्याकडे शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close