जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोळपेवाडी येथील गौतम इन्स्टिट्यूटचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे वतीने हिवाळी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुच्या परीक्षेचा सर्वच विभागांचा निकाल समोर आला असून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी निकालाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयात कु. चांदगुडे श्रद्धा सुरेश हिने ९० टक्के गुण मिळवुन प्रथम आल्याची माहीती प्राचार्य सुभाष भारती यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण १०० टक्के एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु. श्रद्धा सुरेश चांदगुडे ९०.टक्के, द्वितीय क्रमांक कु. दिपाली रवींद्र चंद्रे ८५.८९ टक्के, तृतीय क्रमांक खुशबू इब्राहीम शेख ८३.२२ टक्के, तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक काळोखे अनिल भाऊसाहेब ८९.टक्के, द्वितीय क्रमांक प्रवीण सुनील निकम व रुपाली मारुती मोरे प्रत्येकी ८७.७० टक्के, तृतीय क्रमांक कु. प्रतीक्षा बाळासाहेब जाधव ८६ .५० टक्के, सिव्हील विभागात प्रथम क्रमांक सुरज रंगनाथ कोल्हे ८०.५०टक्के, द्वितीय क्रमांक कल्याणी राजाराम सूर्यवंशी ७८.७० टक्के,तृतीय क्रमांक रफिक यासीन पठाण ७८.३०टक्के, तृतीय वर्ष मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक समाधान बाळासाहेब शिंदे ८६.०० टक्के, द्वितीय क्रमांक दीपक कुसुमकर ८५.१४टक्के, तृतीय क्रमांक ललिता दत्तात्रय तुपे ८३.३३ टक्के, तृतीय वर्ष अॅटोमोबाईल विभागात प्रथम क्रमांक चेतन रामनाथ शिंदे ७७.०५ टक्के, द्वितीय क्रमांक गौरव शेखर पंडित ७४.३२ टक्के, तृतीय क्रमांक गौरव भीमराज सोनवणे ७३.७९ टक्के, याने मिळविला आहे.

द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ८९.६०टक्के एवढा लागला असून यामध्ये मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक संतोष रामदास हराळे ८७.६८ टक्के, द्वितीय गणेश शंकर डेंगळे ७७.३७ टक्के, तृतीय क्रमांक सुरज कैलास शिलेदार ७४.२१ टक्के, द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक यश शशिकांत पोळ८६.७५ टक्के, द्वितीय क्रमांक निकिता बाबासाहेब डोळे ८६.१३ टक्के, तृतीय क्रमांक कु. कामिनी सोमनाथ गवांदे ८५.८८ टक्के, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु.आकांश जयराम थेटे ८३.८७ टक्के, द्वितीय क्रमांक कु. निशा उत्तम ठाकरे ७६.४० टक्के, तृतीय क्रमांक कु. वृषाली बाळासाहेब रांधव ७५.०० टक्के, द्वितीय वर्ष सिव्हील विभागात प्रथम क्रमांक कु. आकांशा सुनील रुकारी ८०.८९ टक्के, द्वितीय क्रमांक शामकांत रमेश गायकवाड ८०.०० टक्के, तृतीय क्रमांक भारत रामनाथ साळवे ७९.७३ टक्के गुण मिळविले आहे.महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल ९८.१६ टक्के एवढा लागला असून प्रथम क्रमांक दर्शन अनिल बनकर ८७.८६ टक्के, द्वितीय क्रमांक धनश्री नितीन भुसारे ८७. टक्के, तृतीय क्रमांक वैष्णवी राजेंद्र गाडे ८६.५७ टक्के गुण मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. अशोक काळे, विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आ. आशुतोष काळे, संस्थेचे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड,मानद सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहलताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य सुभाष भारती सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी आदीनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close